Ads

हत्याकांडातील नऊ आरोपींना पोलिसांकडून अटक, आरोपींची संख्या बारावर

तालुका प्रतिनिधी भद्रावती जावेद शेख :-भंगाराम वार्ड येथील अमर कुळमेथे या (२२) वर्ष युवकाच्या हत्त्या प्रकरणी आणखी नऊ आरोपींना भद्रावती पोलिसांनी दिनांक ३१ रोजी सोमवारला चंद्रपूर येथील बस स्थानक परिसरातून अटक केली आहे. त्यामुळे या हत्याकांडातील आरोपींची संख्या आता बारा वर पोहोचली आहे.
Police arrest nine accused in murder case
यापूर्वी हत्याकांडातील आकाश अरुण सिडाम, वय (३२) वर्ष, क्रिश उर्फ लक्की रवींद्र मरसकोल्हे, वय (२१) वर्ष व प्रवीण उर्फ बंटी गेडाम वय (२७) वर्ष या आरोपींना अटक करण्यात आली आहे.

त्यानंतर आता प्रतीक प्रकाश गेडाम (२८) वर्षे, प्रभाकर घुलाराम गेडाम वय (६०) वर्षे, आकाश शालिक मरसकोल्हे वय (३४) वर्षे प्रथम प्रभाकर गेडाम वय (२१) वर्ष, पुरभ सुधाकर सिडाम वय (३७) वर्ष, प्रशांत बलदेव गेडाम वय (२२ ) वर्ष, त्रिशूल कवडू मरस कोल्हे वय (३०) वर्ष, शैलेश श्रावण आत्राम वय (२१ (वर्षे यांच्यासह फरार होण्यास मदत केल्याप्रकरणी शुभम अशोक इंगोले वय (२८) वर्षे सर्व राहणार भंगाराम वार्ड यांना अटक करण्यात आली आहे.

सदर कारवाई ठाणेदार लता वाडिवे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक संजय सिंग मिश्रा, गुन्हे शोध पथकाचे गजानन तूपकर, जगदीश झाडे, निकेश ढेंगे, अनुप आष्टुनकर, योगेश घाटोळे, रोहित चिटगिरे, महेंद्र बेसेकर व खुशाल कावळे यांनी केली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment