चंद्रपूर :दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील येत्या ६ एप्रिल २०२५ रोज रविवारला श्री रामजन्मोत्सव शोभायात्रा स्वागत समिती - २०२५ च्या माध्यमातून श्रीराम नवमी उत्सव धार्मिक वातावरणात मोठ्या उत्साहाने शहरात साजरा करण्यात येत आहे. श्रीराम नवमी निमित्त शहरातून सायंकाळी ४:३० वाजता शोभायात्रा निघणार आहे. सर्वजातीय तथा सर्वधर्मीय नागरिकांनी मोठ्या संख्येने शोभायात्रेत सहभागी होण्याचे आवाहन श्री रामजन्मोत्सव शोभायात्रा स्वागत समितीतर्फे करण्यात आले आहे.
Shri Ram Ramajanmotsav
procession in Chandrapur city on 6th April
ही शोभायात्रा श्री काळाराम मंदिर येथून निघणार असुन जोड देऊळ, गांधी चौक, लक्ष्मी नारायण मंदिर, जटपुरा गेट, स्वामी नारायण मंदिर, गिरनार चौक यामार्गे परत श्री काळाराम मंदिर येथे पोहोचणार आहे. शोभायात्रेच्या मार्गांवर विविध समाजसेवी धार्मिक संस्थेद्वारे प्रभु रामचंद्राच्या रथाचे पूजन करण्यात येईल. दरम्यान संपूर्ण शहर परिसरात १०० स्वागत द्वार लावण्यात येणार आहेत. शहरात तोरण, झेंडे, रोशनाई करण्यात येणार आहे. रामायण मधील विविध घटनांच्या झांकी तयार करण्यात येणार आहे. या शोभायात्रेत शहरातील गणेश मंडळ आणि व्यायाम शाळेतर्फे देखावे सादर करण्यात येणार आहेत. सोबतच ६० ते ७० समुहांच्या माध्यमातून शोभायात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करणार आहे. शेवटी श्री काळाराम मंदिर येथे भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. या निमित्त होणाऱ्या शोभायात्रेत व महाप्रसादास शहरातील सर्वधर्मीय तथा सर्वजातीय नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित व्हावे, असे आयोजक समितीने म्हटले आहे.
श्री रामजन्मोत्सव शोभायात्रा समितीचे अध्यक्ष शैलेश बागला यांनी प्रास्ताविकातून सखोल माहिती दिली. तर योगेश भंडारी, अजय वैरागडे आदींनी इतर माहिती दिली.
यावेळी श्री रामजन्मोत्सव शोभायात्रा समितीचे अध्यक्ष शैलेश बागला, कार्याध्यक्ष रोडमल गहलोत, उपाध्यक्ष विनोद उपाध्याय, सचिव विजय येंगलवार, कोषाध्यक्ष सुधीर टिकेकर, सदस्य विश्वास माधमशेट्टीवार, सदस्य, नितीन गाटकीने, ब्रीजगोपाल, तथा श्री रामजन्मोत्सव शोभायात्रा स्वागत समितीचे अध्यक्ष योगेश भंडारी, उपाध्यक्ष डॉ. अशोक जीवतोडे, उपाध्यक्ष डॉ. गोपाळ मुंधळा, उपाध्यक्ष अजय वैरागडे, उपाध्यक्ष अरुण तीखे, सचिव दीपक बेले, सहसचिव सचिन गाटकीने, श्री रामजन्मोत्सव शोभायात्रा सल्लागार समितीचे हरिश्चंद्र अहिर, मधुसूदन रुंगठा, रामकिशोर सारडा, ज्ञान टहलियानी, संदीप पोशटीवर, मनीष सूचक, सुरेश शर्मा, मिलिंद कोतपल्लीवार, चमकोर सिंह, रामजीवन परमार, शैलेंद्र शुक्ला, सुनील महाकाले आदी उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment