Ads

इथे सदोदित वाहत असतो माणुसकीचा झरा

जावेद शेख भद्रावती प्रतिनिधी :-
भद्रावती- चंद्रपूर जिल्यातील भद्रावती तालुका एक ऐतिहासिक वारसा लाभलेला सर्वधर्मसमभाव जोपासलेला तालुका म्हणून परिचित आहे.
The fountain of humanity flows here forever.
आजच्या काळात खून, बलात्कार, लूट, फसवणूक अश्या बातम्या निरंतर आपण वाचत असतो व आपला समाज, तरुणाई याच कृत्याकडे जास्त वळलेली दिसतेय पण या सर्व गोष्टीला बगल मिळते ती युवाशक्ती सोशल वेलफेयर फाउंडेशन च्या कृत्याची.
समाजसेवेचे व्रत अंगीकारून समाजातील गरजू व्यक्तींना मदतीचा हाथ पुढे करणाऱ्या या फाउंडेशन ची निर्मिती एक जानेवारी 2025 रोजी शुभम दिलीप मत्ते यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली.
समाजासाठी सदैव तत्पर राहणारे हे फाउंडेशन भद्रावती तालुक्यातील मुरसा, घोनाड व परिसरातील काही तरुण मंडळींच्या सहकार्याने तैयार करण्यात आले व हे फाउंडेशन गरजू, मदतगार लोकांपर्यत तुरंत पोहचून मदत करण्यासाठी नेहमी पुढे असतात, असेच या फाउंडेशन चे एक स्तुत्य कार्य नुकतेच अनुभवाला मिळाले. घुग्गुस साखरवाही रोड वर मुरसा जवळ काही दिवसांपासून एक गतिमंदसदृश्य 55-60 वर्ष्याची व्यक्ती रस्त्याच्या कडेला चंद्रपूर जिल्याच्या प्रखर आणि रखरखत्या उन्हात दिवस रात्र आपलं जीवन खितपत घालवत होता, या दरम्यान रस्त्याने येणे जाणे करणारे पादचारी व अन्य लोक कधी त्याला पाणी तर कधी जेवण देऊन आपले सामाजिक दायित्व पार पाडत होते.
पण हे काम किती दिवस चालणार ? जणू हीच शंका त्या साठ वर्ष्याच्या वृद्धाला पडली होती. याची भनक युवाशक्ती सोशल वेलफेयर फाउंडेशन चे अध्यक्ष शुभम मत्ते व उपाध्यक्ष आकाश घोरपडे यांना लागताच त्यांनी तुरंत आपली सूत्र चालवली व फाउंडेशन च्या सदस्यांच्या मदतीने त्या वृद्ध व्यक्तीला आंघोळ, कपडे, जेवण व वैद्यकीय सेवा देऊन आपले सामाजिक ऋण फेडले व या व्यक्तीला पुढील वैद्यकीय सेवेसाठी ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे दाखल करून घेतले आहे.
सादर वृद्ध व्यक्ती आपले नाव गाव व इतर कोणतीही माहिती देण्याच्या मानसिकतेत नसल्यामुळे फोटोतील या व्यक्तीला कोणी ओळखत असेल तर युवाशक्ती सोशल वेलफेयर फाउंडेशन चे अध्यक्ष मा शुभम मत्ते यांच्या 7350607035 या नंबर वर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे
या सामाजिक दायित्वात मोलाची भूमिका निभवली ती शुभम मत्ते, आकाश घोरपडे, वैभव शेरकी, शंकर कोहळे, हर्षल बोढाले, सोहम घोटकर, आदर्श घोटकर, विवेक बोरीकर, साहिल शेरकी, करण आत्राम, सचिन झाडे, तेजस उपासे, सुनील घोटकर यांनी. यांच्या या कार्याबद्दल समाजातील सर्व स्तरातून यांचे कौतुक करण्यात येत आहे
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment