Ads

देवाडा येथील एकलव्य शाळेतील विद्यार्थीनींचे धरणे आंदोलन

राजुरा, ता.प्र. -राजुरा तालुक्यातील देवाडा येथील एकलव्य रेसिडेंशियल स्कुल च्या प्राचार्यांच्या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले असून प्राचार्य संजय बोंतावर यांना कायम प्राचार्य म्हणून नियुक्ती करावी, यासाठी शाळेतील विद्यार्थीनींनी दिनांक 6 एप्रिल ला भर उन्हात शाळा प्रांगणात धरणे दिले.
Students of Ekalavya School in Devada stage protest
प्राचार्य हे अतिशय चांगले आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सतत कार्यशील असुन त्यांची नियमित प्राचार्य म्हणून नियुक्ती करण्याची मागणी विद्यार्थ्यांनीच केल्यामुळे पुन्हा या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एक - दोन शिक्षकांच्या चुकीच्या वृत्तीमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागल्याचा आरोपही केला जात आहे.
राजुरा तालुक्यातील देवाडा येथे एकलव्य माॅडेल निवासी शाळा आहे. या शाळेतील प्रभारी प्राचार्य संजय बोंतावार यांनी शाळेला शिस्तबध्द करण्यासाठी काही उपक्रम राबविले. मात्र एका शिक्षिकेने त्यांची पोलिसांकडे तक्रार करून या प्राचार्याविरूध्द विनयभंगाचा गुन्हा राजुरा पोलिस ठाण्यात दाखल केला. यानंतर प्राचार्याची येथून बदली करण्यात आली. याविरूध्द शाळा व्यवस्थापन समितीने प्राचार्याविरूध्द केलेले सर्व आरोप खोटे, निराधार व आकसापोटी केले असून त्यात मुद्दाम शिस्तप्रिय प्राचार्यांना गोवण्यात आल्याचा आरोप केला होता. वास्तविक प्राचार्य संजय बोंतावार हे शिस्त, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती याबाबत अतिशय सजग होते. त्यामुळे तेच आम्हाला प्राचार्यपदी हवेत, असा आग्रह विद्यार्थ्यांनी धरला असून त्यांनी या शाळेतच धरणे आंदोलन केले.
यापुढे आदिवासी विभाग व प्रकल्प अधिकारी कोणती कार्यवाही करतात, याकडे आंदोलनकर्त्या विद्यार्थीनी, पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीचे लक्ष लागले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment