ब्रम्हपुरी : ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव, चिचखेडा या परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या एका पंधरा वर्षीय पट्टेदार वाघाला गुरुवारी (दि.१७) वनविभागाने जेरबंद केले. या वाघाने आठवड्याभरात दोघांचा बळी घेतला आहे.
T-3 tiger imprisoned in a cage
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव, चिचखेडा व लगतच्या परिसरात T-3 या पट्टेदार वाघाने धुमाकुळ घातला होता. अनेकदा परिसरातील नागरिकांना या वाघाचे दर्शन झाले होते. १३ एप्रिलला सकाळी मोहफुले वेचण्यासाठी गेलेल्या चिचखेडा येथील ६० वर्षीय वृद्ध विनायक विठोबा जांभुळे यांना या वाघाने ठार केले. लगतच्या आवळगाव येथील आणखी एकजण वाघाचा हल्ल्यात ठार झाला व दोघेजण जखमी झाले. त्यानंतर या परिसरात वाघाचा धुमाकूळ सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परिसरातील नागरिकांनी आक्रमक भूमिका घेऊन वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केल्याने वन विभागाने वाघाला जेरबंद करण्यासाठी नियोजन केले. गुरुवारी उत्तर ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रातील उपक्षेत्र मेंडकी नियतक्षेत्र चिचखेडा मधील कक्ष क्रमांक १५२ मध्ये पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी तयार करून दिलेल्या डॉटद्वारे पोलिस हवालदार अजय सी. मराठे यांनी वाघाला अचूक डॉटद्वारे निशाणा लावून दुपारी सव्वा बाराच्या सुमारास बेशुध्द करुन जेरबंद केले.
0 comments:
Post a Comment