Ads

आयपीएल क्रिकेट मॅच वर ऑनलाईन सट्टा घेणाऱ्या तिघांना अटक, एक लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त...

राजुरा :-आयपीएल 2025 IPL 2025 स्पर्धेतील मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली डेअरडेव्हिल्स सामन्यावर ऑनलाईन बेटिंग सट्टा लावणाऱ्या टोळीवर राजुरा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. बामणवाडा येथील विहान रेस्टॉरंटच्या मागे सुरू असलेल्या ऑनलाईन जुगारावर पोलिसांनी छापा टाकून तिन आरोपींना अटक केली असून, एक आरोपी फरार आहे. एकूण एक लाख रुपयांचा मोबाईल मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Three arrested for online betting on IPL cricket matches, assets worth Rs 1 lakh seized...
दिनांक १३ एप्रिल, २०२५ रोजी मुखबिर द्वारे खबरेवरुन राजुरा पोलीसांनी मौजा बामनवाडा येथील विहान रेस्टॉरंटचे मागे एमआयडीसी परिसरामध्ये जुगार रेड कारवाई केली असता सदर ठिकाणी आरोपी नामे श्रषिक उर्फ सोनु धनराज चुनारकर, आवेश जावेद शेख, संजय श्रीरंग कोडापे व स्वप्नील लांडे सर्व रा. राजुरा हे मुंबई इंडियन्स विरुध्द दिल्ली डेअर डेव्हिल्स दरम्यान होणारी आयपीएल २०२५ क्रिकेट मॅचवर मोबाईलवर ऑनलाईन सट्टा बेटींगचा जुगार खेळतांना मिळुन आल्याने त्यांचेविरुध्द पोलीस स्टेशन राजुरा येथे अपराध क्रमांक १९०/२०२५ कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार कायदा, सहकलम ४९, ११२ भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असुन आरोपी क्रमांक १ ते ३ यांना अटक करण्यात आली असुन आरोपीकडुन एक नग विवो कंपनीचा वी३० मोबाईल, एक अॅपल कंपनीचा आयफोन १३ प्रो मॅक्स आणि एक विवो कंपनीचा वी २३ असा एकुण १,००,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली श्री अनिकेत हिरडे, परिविक्षाधिन सहा. पोलीस अधीक्षक तथा प्रभारी ठाणेदार राजुरा यांचे नेतृत्वात पोउपनि श्री भिष्मराज सोरते, श्री हाके, सफौ किशोर तुमराम, पोहवा विक्की, पोअं. शरद राठोड, महेश बोलगोडवार, शफीक शेख, आनंद मोरे, तिरुपती जाधव यांनी केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment