जावेद शेख भद्रावती :-भारतीय सैन्याच्या अभूतपूर्व यशाबद्दल त्यांच्या पराक्रमाचे समर्थन आणि कौतुक करण्यासाठी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहेत, तिरंगा यात्रेत भारतीय नागरिकांचे नैतिक कर्तव्य म्हणून संपूर्ण सामाजिक संघटना, व्यापारी संघटना, राजकीय पक्ष, विद्यार्थी ,नारीशक्ती ,असे हजारो ,नागरिकांनी उपस्थिती दर्शवून भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ तिरंगा रॅलीत सहभागी होऊन भारतीय सैनिकांचे मनोबल वाढवावे
पहलगाम येथे पाकिस्तान प्रायोजित आतंकवाद्यांनी भारताच्या विविध राज्यांतील २६ निष्पाप नागरिकांची हत्या केली. त्या आतंकवादी कारवाई विरोधात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकीस्तान विरोधात कठोर भूमिका घेत भारतीय सैन्याला पाकिस्तान प्रायोजित आतंकवादा विरोधात कारवाई करण्याची खुली सुट दिल्यानंतर भारतीय सैन्याकडून ऑपरेशन सिंदुर राबविण्यात आल्यावर अवघ्या तीन दिवसांत पाकिस्तानने गुडघे टेकले. भारतीय सैन्याच्या अभुतपुर्व यशाबद्दल त्यांच्या पराक्रमाचे समर्थन आणि कौतुक करण्यासाठी भारतीय सेनेच्या शौर्याला व त्यांनी केलेल्या अतुलनीय पराक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी तसेच शहिदांना अभिवादन करण्यासाठी भद्रावती येथे भव्य तिरंगा यात्रा 30 मे ला सायंकाळी चार वाजताआयोजित करण्यात आली. तिरंगा यात्रा स्वर्गीय बाळासाहेब प्रवेशद्वार पासून सुरू होऊन भद्रावतीशहरातील प्रमुख मार्गावरून भ्रमण करीत हुतात्मा स्मारक येथे यात्रेचा समारोप होणार आहे, तिरंगा यात्रेत उपस्थितांनी भद्रावतीशहरातील राष्ट्रप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित रहावेअशी आग्रहाची विनंती करण्यात आली आहेत
0 comments:
Post a Comment