Ads

तालुकास्तरीय शेतकऱ्यांची खरीप हंगाम पुर्व व साथी पोर्टलवर बियाणे विक्रीबाबत प्रशिक्षण Training of taluka-level farmers on pre-kharif season and seed sales on Saathi portal

जावेद शेख प्रतिनिधी भद्रावती:-
पंचायत समिती व तालुका कृषी अधिकारी भद्रावती यांच्या वतीने पंचायत समिती सभागृहात तालुकास्तरीय खरीप हंगाम पुर्व व साथी पोर्टलवर बियाणे विक्रीबाबत प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली.
Training of taluka-level farmers on pre-kharif season and seed sales on Saathi portal
    या प्रशिक्षण कार्यशाळा पंचायत समितीचे सहा. गट विकास अधिकारी डॉ.बंडुआकनुरवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.प्रमुख मार्गदर्शक कृषी विकास अधिकारी मा.विरेंद्र रजपूत, मोहीम अधिकारी मा.लंकेश कटरे प्रमुख उपस्थिती तालुका कृषी अधिकारी सुुशिल आडे,कृषी अधिकारी महेंद्र डाखरे होते. यावेळी  मा.लंकेश कटरे यांनी साथी पोर्टलवर बियाणे विक्रीबाबत प्रात्यक्षिकांसह सविस्तर माहीती दिली. कृषी विकास अधिकारी विरेंद्र रजपूत यांनी गुणनियंत्रण,शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पेरणीपूर्व नियोजन करण्याबाबत,सहा.गट विकास अधिकारी डॉ.बंडुआकनुरवार यांनी शासनाने कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पंधरा एप्रिल पासून शेतकरी ओळखपत्र क्रमांक अनिवार्य केल्यामुळे  अग्रीस्टेक प्रणालीवर शेतकऱ्यांनी फॉर्मल आयडी काढण्याबाबत व शासनाच्या विविध योजनांचे लाभ घेण्याचे आवाहन केले.तालुका कृषी अधिकारी सुुशिल आडे यांनी शेतकऱ्यांनी खरीप पेरणी पुर्व हंगामाच नियोजन करण्याबाबत मार्गदर्शन केले.
     प्रशिक्षण गट विकास अधिकारी मा.आशुतोष सपकाळ यांच्या मार्गदर्शनात घेण्यात येऊन प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी सुुशिल आडे संचालन कृषी विस्तार अधिकारी प्रमोद ढोरे आभार कृषी अधिकारी महेंद्र डाखरे यांनी केले.प्रशिक्षणाला तालुक्यातील कृषी केंद्र संचालक, शेकडो शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment