चंद्रपूर :महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या बारावीचा सत्र २०२४-२५ चा निकाल आज (दि. ५) ला जाहीर झाला. यानुसार याही वर्षी जनता कनिष्ठ महाविद्यालयाने यशाचा इतिहास अबाधित ठेवला आहे.
Excellent results of Janata College in 12th standard
जनता कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल ९९% टक्के, कला शाखेचा निकाल ८८.७८% ; वाणिज्य शाखेचा निकाल ९३.०४% तर एम.सी.व्हि.सी. शाखेचा निकाल ५०% इतका लागलेला आहे.
महाविद्यालयातून विज्ञान शाखेतून कु. त्रिशा विजय होकम (९४.३३%), कु. मानवी सुधीर कापसे (९१.१७%), कु. नेन्सी जगन्नाथ प्रसाद (९१%), कु. प्राची प्रवीण आबोजवार (९०.३३%), अजीम अब्दुल वहाब फारुकी (८९.३३%), ओमकार अमर देवाळकर(८९.१७%) हे विद्यार्थी प्राविण्यप्राप्त आहेत.
कला शाखेतून ज्ञानेश्वर गुरुदास थेरे (६५.८३%), कु. प्रीती राजा काळे (६४.५०%), सुप्रीत विकास टिपले (६३.८३%) वाणिज्य शाखेतून देवांगशी संजय धकाते (८५.००%), शुभांक नितीश दास (८४.६७%), मिस्बा फातिमा नौशाद सय्यद (८३.८३%), एम.सी.व्हि. सी. शाखेतून श्रीयुत अजय नक्षने (६४%) हे विद्यार्थी प्रावीण्यप्राप्त झालेले आहेत.
प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे मंडळाच्या अध्यक्षा डॉ.सौ. प्रतिभाताई जिवतोडे, संस्थेचे सेक्रेटरी डॉ. अशोक जीवतोडे, महविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष महातळे, उपप्राचार्य सौ. के.ए. रंगारी, प्रा. लीलाधर खंगार,प्रा.नितीन कुकडे, डॉ. के.सी.पाटिल, डॉ. दीपिका संतोषवार, डॉ. माया धमगाये, प्रा. विद्या शिंदे, प्रा. माया बिस्ट, प्रा. शरद कुत्तरमारे, प्रा. रविकांत वरारकर, डॉ. प्रविण चटप, प्रा.महेश यार्दी, प्रा. अरूण बर्डे तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचा-यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
0 comments:
Post a Comment