Ads

वनपरिक्षेत्र कार्यालयात १२ एप्रिल पासून आगीचे तांडव : महत्वपूर्ण दस्तावेज व चारचाकी वाहन जळून खाक

जावेद शेख प्रतिनिधी भद्रावती:-
वनविभाग क्षेत्राच्या कार्यालयास गेल्या १२एप्रिल पासून सातत्याने लहान- मोठी आग लागत आहे. दि.४ मे ला रात्रो ९.३० वाजता तर त्याठिकाणी उभ्या असलेल्या एका चारचाकी गाडीला अचानक आग लागली. त्यावर वन कर्मचाऱ्यांनी नियंत्रण मिळवल्याने पुढील अनर्थ टळला.यावेळी बघ्यानी खूप गर्दी केली.
Fire breaks out at forest range office since April 12: Important documents and four-wheeler burnt to ashes
विशेष म्हणजे लागत असलेल्या आगी त्या ठिकाणी कार्यरत क्षेत्र सहायक विकास शिंदे यांच्याशी संबंधित आहे. त्यांच्या कार्यालयाची कागदपत्रे आणि इतर साहित्याला आग लागत आहे हे विशेष. लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी बोलावलेली नगरपरिषदेची अग्निशमन गाडी आलीच नाही. त्या ठिकाणी उपस्थित कर्मचाऱ्यांनी पाणी मारून आग विझविली यात एमएच ३२- ५४३७ ही बेलोरे कंपनीची चार चाकी गाडी खाक झाली.सदर गाडी विकास शिंदे यांच्या मालकीची होती.आगी लागण्याच्या घटनांची सुरवात दि.१२ एप्रिलला दुपारी साडे बारा वाजताच्या घटनेपासून झाली.यात पहिल्या घटनेत वनविभागाच्या गोडाऊनला आग लागली. नंतर अधे-मध्ये आगी लागत राहिल्या. त्यात लाकुड, कार्यालय, रेकॉर्ड रूम मधील कागदपत्रे, फाईल, सिमेंट बॅग,खाली ऑईल पेंटचे डबे, ब्रश यासह इतर साहित्य जे शिंदे यांच्याशी संबंधित आहे ती जळून खाक झाली.हा भानामातीचा प्रकार आहे की शिंदे यांचा बदला घेण्यासाठी कुणी हा प्रकार करीत आहे. अशी शहरात चर्चा आहे. घडत असलेल्या या प्रकाराने विकास शिंदे हतबल झाले आहे. याबाबत त्यांना विचारणा केले असता डोळ्यात पाणी आणून त्यांनी मी कुणाचेही वाईट केले नाही. या प्रकाराने मी गोंधळून गेलो आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली.या घटनेने वनविभागतील वन अधिकारी, कर्मचारी तसेच आजूबाजूचे रहिवासी दहशतीत आहे.ते डोळ्यात तेल घालून हा प्रकार कोण घडवित आहे.याचा शोध घेत आहे.या आगीच्या प्रकरणाची पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. ठाणेदार लता वाडिवे यांचे मार्गदर्शनात तपास सुरू आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment