जावेद शेख प्रतिनिधी भद्रावती:-
दि. १२/०५/२५ शिलभद्र मंडळ भद्रावती तर्फे बुद्ध जयंती, सम्राट अशोक, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या जयंती निमित्त पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी अशोका बुद्ध विहार येथे महापुरुषांचे कार्य याविषयी चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन दि. ४ मे ला करण्यात आले होते.
Meritorious persons felicitated by the Tehsildar on behalf of Sheelbhadra Mandal
स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र आणि पुस्तक राजेश भांडारकर, तहसीलदार भद्रावती तसेत विनोद ठमके, संचालक साईप्रकाश कला अकादमी, क्षितीज शिवरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयभीम भगत, प्रास्ताविक प्रवीण चिमुरकर तर आभार सागर कांबळे यांनी मानले. यावेळी शिलभद्र मंडळाचे अध्यक्ष भारत खोब्रागडे, सागर कांबळे, कुलदिप कांबळे, शरद भावे, पुनित नगराळे, जयभीम भगत, अनिल बांबोडे, जवादे, टेंम्भुर्णे, सारिका पथाडे, मेघा कांबळे, तारा खोब्रागडे, योगिता चिमुरकर आणि समस्त मंडळ सदस्य, पदाधिकारी उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment