Ads

लेंडाळा तलावाच्या पुनरुज्जीवनाला आमदार करण देवतळे यांच्या प्रयत्नांची जोड; १७ कोटी २५ लाखांच्या अमृत २.० योजनेतून भव्य प्रकल्पास मंजुरी

भद्रावती जावेद शेख :- भद्रावती शहराच्या हृदयस्थानी असलेला ऐतिहासिक लेंडाळा तलाव लवकरच नव्या रूपात उजळून निघणार आहे. केंद्र सरकारच्या ‘अमृत २.०’ योजनेअंतर्गत १७ कोटी रुपयांचा भव्य प्रकल्प मंजूर झाला असून, या प्रकल्पाच्या मंजुरीमागे आमदार करण देवतळे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि राजकीय इच्छाशक्ती निर्णायक ठरली आहे.
MLA Karan Devtale's efforts contribute to the revival of Lendala Lake; Approval for a grand project under the Amrut 2.0 scheme worth Rs 17 crore 25 lakhs
लेंडाळा तलाव हा केवळ जलस्रोत नसून शहरवासीयांच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग राहिला आहे. या तलावाभोवती अनेक पिढ्यांच्या आठवणी रुजल्या आहेत. मात्र गेल्या काही दशकांत दुर्लक्षित झालेल्या या तलावाच्या संवर्धनाची गरज भासू लागली होती. ही गरज ओळखून आमदार देवतळे यांनी राज्य शासन व केंद्र शासनाच्या नागरी विकास मंत्रालयाशी सातत्याने पत्रव्यवहार केला, बैठका घेतल्या, प्रस्ताव सादर केले. त्यांनी तलावाच्या ऐतिहासिक, पर्यावरणीय आणि सामाजिक महत्त्वावर भर देत हे काम केवळ सौंदर्यीकरणापुरते मर्यादित न ठेवता एकात्मिक विकासाचे दृष्टीकोन सादर केला.

या मंजूर प्रकल्पात तलावाची सखोल स्वच्छता, गाळ काढणे, काठाच्या मजबुतीकरणासह संपूर्ण परिसराचे सुशोभीकरण, फिरण्यासाठी पायवाटांची निर्मिती, दिव्यांची व्यवस्था, बसण्यासाठी आसन व्यवस्था, पर्यटकांसाठी आकर्षक व्यवस्था आणि शहरवासीयांसाठी विश्रांतीचे उत्तम ठिकाण उभारण्याचे नियोजन आहे. यामुळे या ठिकाणी पर्यटनाला चालना मिळणार असून स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होतील.

या प्रकल्पामुळे लेंडाळा तलावाचे जतन होऊन त्याचे रूपांतर एका समृद्ध आणि जीवंत नागरी जागेत होणार आहे. आमदार देवतळे यांनी या प्रकल्पाबाबत मिळालेली मंजुरी ही फक्त निधीची बाब नसून, शहराच्या सांस्कृतिक आणि पर्यावरणीय भविष्याची दिशा असल्याचे मत व्यक्त केले आहे. लवकरच या प्रकल्पाचे भूमिपूजन होणार असून, त्यानंतर प्रत्यक्ष कामांना गती मिळणार आहे.

भद्रावतीसारख्या वाढत्या शहरासाठी जलस्रोताचे जतन व हरित परिसराचे निर्माण ही काळाची गरज असून, त्यासाठी लेंडाळा तलावाचे पुनरुज्जीवन हा एक मैलाचा दगड ठरणार आहे. आमदार देवतळे यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विकासाच्या दिशेने टाकलेले हे ठोस पाऊल नागरिकांना दीर्घकालीन फायदे देणारे ठरेल, याबाबत कुठलीही शंका नाही.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment