जावेद शेख भद्रावती प्रतिनिधी :-
अवैध रेती वाहतूक करीत असलेल्या दोन पिकअप गाड्यांवर कारवाई करीत दोन्ही गाड्या तहसील कार्यालयात जमा करण्यात आल्या आहेत. सदर कारवाई महसूल विभागाद्वारे दिनांक ७ रोज बुधवार ला सकाळी 11 वाजता बरांज गावाजवळ करण्यात आली.
Revenue Department takes action against two pickup trucks transporting illegal sand.
ग्राम महसूल अधिकारी राहुल भोंगळे हे एका शासकीय कार्यक्रमासाठी जात असता त्यांना बरांज गावाजवळ एम एच 34 एम 59 16 व एम एच 34 ए् व्ही 2074या दोन गाड्यांमध्ये रेतीची अवैध वाहतूक करताना आढळून आले. चौकशी केल्यानंतर त्यांच्याजवळ रेतीचा परवाना आढळून आला नाही. त्यानुसार या दोन्ही गाड्यांवर कारवाई करण्यात आली व दोन्ही गाड्या तहसील कार्यालयात जमा करण्यात आल्या. सध्या तहसीलदार राजेश भांडारकर यांनी रेती तस्करां विरोधात तीव्र मोहीम सुरू केल्याने रेती तस्करात चांगलीच खळबळ उडाली आहे. सदर गाड्या अजय लिहितकर व प्रवीण नागपुरे यांच्या मालकीच्या असल्याचे कळते.सदर कारवाई तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या नेतृत्वात ग्राम महसूल अधिकारी राहुल भोंगळे, बंडू वेलफुलवार व निर्दोष फुलभोगे यांनी केली.
0 comments:
Post a Comment