Ads

सिंदेवाहीतील 'त्या' हल्लेखोर वाघिणीचा दुसरा बछडा जेरबंद

(प्रशांत गेडाम) सिंदेवाही : सिंदेवाही वनपरिक्षेत्रात १३ मे रोजी मेंढा माल येथील तीन महिलांचा बळी घेणाऱ्या वाघिणीला जेरबंद केल्यानंतर तिच्या चारपैकी एका बछड्याला जेरबंद करण्यातआले होते. आता दुसऱ्या नर बछड्यालाही मंगळवारी दि् .(२७ मे) पहाटे सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास डोंगरगाव नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक १३६० मध्ये बेशुद्ध करून यशस्वीरीत्या जेरबंद करण्यात आले आहे.
Second calf of 'that' attacking tigress in Sindewahi captured
याला नागपुरातील गोरेवाडा येथे डब्ल्यूआरटीसीमध्ये नेण्यात आले आहे. वनविभाग अजून दोन बछड्यांच्या शोधात आहे. १० मे रोजी सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र डोंगरगाव परिसरात तेंदूपत्ता गोळा करायला गेलेल्या मेंढा (माल)येथील कांता चौधरी, सारिका शेंडे, शुभांगी चौधरी या महिलांना कक्ष क्रमांक १३५५ मध्ये वाघिणीने हल्ला करून जागीच ठार केले होते. या घटनेनंतर वन विभागाने घटनास्थळी कॅमेरा ट्रॅप व लाइव्ह कॅमेरे लावले होते. हल्लेखोर वाघिणीला १३ मे २०२५ रोजी बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले. नंतर तिला गोरेवाडा डब्ल्यूआरटीसीमध्ये पाठविण्यात आले. तेव्हापासून वनविभाग तिच्या बछड्यांचा शोध घेत आहे. डोंगरगाव क्षेत्रात वाघिणीचे बछडे संचार करीत असल्याच्या माहितीच्या आधारे सशस्त्र पोलिस दलाचे अजय मराठे यांनी वाघिणीच्या १२ ते १४ महिने वयाच्या दुसऱ्या नर बछड्याला बेशुद्ध करून जेरबंद केले
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment