चंद्रपूर : २२ जून२०२५ ला कामगार मनोरंजन केंद्र उर्जानगर चंद्रपूर येथे दुपारी १२ वाजता राज्यस्तरीय २५ व्या पर्यावरण संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून संमेलनाचे उद्घाटन चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते होणार आहे. सहउद्घाटक म्हणून गडचिरोलीचे खा. डॉ.नामदेव किरसान आणि वरोरा -भद्रावती क्षेत्राचे आमदार करण देवतळे तर पर्यावरण संमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रपूर येथील विचारवंत दलितमित्र व आदिवासी सेवक डी.के.आरिकर राहणार आहे.
तर या संमेलनात विशेष अतिथी म्हणून डॉ. रमेशकुमार बोरकुटे , प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव, उपप्रादेशिक अधिकारी उमाशंकर भादुले, सीटीपीएसचे मुख्य अभियंता विजय राठोड, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार म.रा.वि.म.चे महाव्यवस्थाक नंदकिशोर पांडे, आरटीओ किरण मोरे, दालमिया सिमेंटचे प्रणवकुमार नायक टेमराज माले, डॉ. बळवंत भोयर, डॉ.तुकाराम धोबे ,रिनाताई पांडे, अर्चना राठोड यांची उपस्थिती राहणार आहे. सदर संमेलनात पर्यावरणाचे समतोल राखण्यासाठी उपाय या विषयावर चर्चा होणार असून पर्यावरण
रत्न , पर्यावरण भूषण व पर्यावरण मित्र पुरस्काराचे वितरण व समाजभूषण पुरस्कार व विशेषांकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. तरी सदर संमेलनास पर्यावरण प्रेमिंनी संमेलनात मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक हरीश ससनकर, डॉ.देव कन्नाके, आशिष येडांगे, संक्षीप्ता शिंदे, विद्या चित्ताडे, सुधीर कोरडे, राजेश सोलापन, शालीनी महाकुलकर,अनुराधा जोशी, अनुपमा बुजाडे, सुरेश शर्मा, प्रदीप अडकिने यांनी केले आहे.
0 comments:
Post a Comment