भद्रावती जावेद शेख :-शिवसेनेचे मुख्य नेते ना. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार चंद्रपूर जिल्हा शिवसेना (शिंदे) प्रमुख पदी अड. युवराज धानोरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Adv. Yuvraj Dhanorkar appointed as Shiv Sena (Shinde) District Chief.
त्यांच्याकडे चंद्रपूर व बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचा कार्यभार देण्यात आला आहे. सदर नियुक्तीचे पत्र त्यांना शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांच्याकडून प्राप्त झाले आहे. भंडारा येथे पार पडलेल्या पक्षाच्या विदर्भ नियुक्तीच्या कार्यक्रमात त्यांना नियुक्तीपत्राचे प्रदान करण्यात आले.यावेळीआ.नरेंद्र भोंडेकर,चंद्रपुर संपर्कप्रमुख मंगेश काशीकार,युवासेना प्रमुख आलेख रट्टे,शैलेश केलझकर,बल्लारपुर तालुकाप्रमुख जमील शेख,बल्लारपुर विधानसभा संघटक भुषण जाधव,मुनेश्वर बदखल आदी मान्यवर ऊपस्थीत होते.याआधी त्यांनी शिवसेनेचे जिल्हा संघटक पदाची धुरा यशस्वीरित्या सांभाळली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे चंद्रपूर तथा बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात शिवसेना पक्ष अधिक बळकट होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. त्यांच्या नियुक्ती बद्दल अड.धानोरकर यांचे पक्षाच्या सर्व स्तरावरून अभिनंदन केल्या जात आहे.
0 comments:
Post a Comment