Ads

वरोरा-भद्रावतीत शिंदे गटाचा झेंडा फडकणार!

सादिक थैम वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्रात शिवसेना (शिंदे गट) आता अधिक ताकदीने उदयास येताना दिसत आहे. लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे यांचे प्रयत्न आणि नेतृत्वाखाली आज१७ जून रोज मंगळवारला मुंबई येथे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मोठा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
The flag of the Shinde group will be hoisted in Warora-Bhadrawati!
या प्रवेशामुळे वरोरा-भद्रावतीतील राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळण्याची शक्यता असून शिंदे गटाचे संघटनात्मक बळ वाढले मोठी आहे.
या भव्य प्रवेश सोहळ्यात वरोरा व भद्रावती नगर परिषदांतील माजी नगरसेवक, विविध ग्रामपंचायतीतील सरपंच-उपसरपंच, सदस्य, बाजार समितीचे माजी संचालक, महिला व युवक शिवसैनिक यांचा समावेश आहे. भद्रावतीतील माजी उपनगराध्यक्ष प्रफुल चटकी, तीनदा नगरसेवक राहिलेले सुधीर सातपुते, प्रमोद गेडाम, अनिता मुडे, राजू सारंगधर, चंद्रकांत खारकर, शोभाताई पारखी, शितलताई गेडाम, प्रतिभाताई सोनटक्के, आशाताई निंबाळकर, प्रदीप वडाळकर यांचा समावेश लक्षणीय ठरतो.

त्याचप्रमाणे वरोरा नगरपरिषदेतील माजी नगरसेवक दिनेश यादव, प्रणाली मेश्राम, सुषमा भोयर तसेच वरोरा शहर संघटक किशोर टिपले यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.
ग्रामपंचायत स्तरावरही मोठी उलथापालथ झाली असून आष्टी (काकडे), टेमुर्डा, वडेगाव, आठमुर्डी, पळसगाव, कढोली, बोर्डा, परसोडा, शेगाव बुद्रुक, सालोरी, पाचगाव, वाघेड़ा, चरूरखटी या गावांतील सर्वोच्च पदाधिकारी शिंदे गटात दाखल झाले. या भागातील ग्रामीण नेतृत्व विशेषतः गोविंदा कुळमेथे, सुचिता ठाकरे, उमेश दातारकर, विठ्ठल जोगी, स्वप्निल वासेकर, सचिन डुकरे, भूषण बुरीले, रमेश पावडे आदींनी पक्षप्रवेश करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास व्यक्त केला.

वरोरा बाजार समितीचे माजी संचालक राजू आसुटकर व संदीप चौधरी, तसेच शेकडो कट्टर शिवसैनिक, ज्येष्ठ कार्यकर्ते साळवे महाराज, ओमदेव रोडे, भाऊराव घागी, रवींद्र नांदे यांचाही सहभाग या कार्यक्रमात आहे. युवासैनिक गितेश पूसनाके, यश पोटे, आशिष दडमल, संकेत नागोसे, अभय चौधरी व महिला कार्यकर्त्यांमध्ये संगीता सारंगधर, कल्पना खारकर, उषा सारंगधर, जोशना कवासे, पोर्णिमा सारंगधर यांनीही पुढाकार घेतला.
मुकेश जिवतोडे यांच्या संयोजनातून पार पडलेल्या या प्रवेश सोहळ्याने वरोरा-भद्रावती परिसरात शिंदे गटाचा झेंडा अधिक भक्कमपणे फडकणार आहे. या सोहळ्यामुळे केवळ पक्षात नवसंजीवनी मिळाली नाही, तर ग्रामस्तरापासून ते शहर पातळीपर्यंत नेतृत्वाचे बळही वाढले आहे.
कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, विकासाच्या राजकारणासाठी जे आपल्यासोबत येतात त्यांना शिवसेना कधीही विसरत नाही. वरोरा-भद्रावती पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत.हे संघटन पुढील निवडणुकांसाठी निर्णायक ठरेल, असा विश्वास स्थानिक स्तरावर व्यक्त केला जात आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment