Ads

डिझेलचा अवैध साठा करणाऱ्यांवर कार्यवाही.

राजुरा :-तालुक्यातील पवनी जिल्हा परिषद शाळा जवळील पडीत रूम मध्ये चार प्लास्टिक कॅनमध्ये डिझेलची साठवणूक करून असताना रेड केली असता क्यानमध्ये एकूण 120 लिटर डिझेल ज्वालाग्रही पदार्थ मिळून आला. या प्रकरणात आरोपीअमृतकुमार राजकुमार राजभर वय-28 वर्ष रा. पोवनी याला अटक करून गुन्हा दाखल केला.
Action against those illegally stockpiling diesel.
राजुरा तालुक्यात पोवनी भागामध्ये मोठ्या प्रमाणात कोळसाखानी सुरू असल्यामुळे वाहतूक दिवस-रात्र सुरू असते या परिसरामध्ये अवैध धंद्याना उधान आले आहे. जिल्हा परिषद शाळेच्या मागे एका पडीत घरामध्ये अवैद्यरित्या डिझेल विक्री होत असल्याबाबतची तक्रार पोलिसांना देण्यात आलेली होती यावरून दिनांक 12 जुलै रोजी राजुरा पोलीसानी छापा मारला. यात रंगेहात 120 लिटर डिझेल अंदाजे दहा हजार आठशे रुपये किमतीचा साठा पोलिसांनी जप्त केला.
सदरची कामगिरी मा पोलीस अधीक्षक सा चंद्रपूर, अप्पर पोलीस अधीक्षक सा चंद्रपूर,मा . पोलीस निरीक्षक श्री सुमित परतेकी सा (म.पो.से.) यांचे नेतृत्वात सपोनी पवार, पाउपनि चाटे, काळे यांनी केली. आरोपी विरुद्ध अप. क्र.323/ 2025 बी.एन.एम. कलम 287 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment