भद्रावती जावेद शेख :- दिनांक २८/०६/२०२५ रोजी पोलीस स्टेशन भद्रावती येथे येवुन फिर्यादी नामे पाडुरंग लहानुजी रामटेके वय ७० वर्ष रा पंचशील वार्ड भद्रावती हे रोजी पोस्टेला येवुन रिपोर्ट दिले कि, माझा मुलगा नागपुर येथे राहत असुन दिनांक २३/०६/०२५ रोजी सकाळी ०६.०० वा दरम्यान मी त्याला भेटण्याकरीता घराचा दरवाजाला ताला लावुन नागपुरला निघालो.
Two accused arrested for burglary in Panchsheel ward in Bhadravati area
दिनांक २७/०६/०२५ रोजी फिर्यादीचा मुलाचा घरी नगपुरला हजर असताना मला माझे मुलीचा मुलगा करण उमरीकर यांनी मला फोन करून सांगीतले कि, आबाजी तुम्हचे घराचे समोरचे दरवाजाचा ताला तुटलेला दिसत आहे. घरी चोरी झाली असा संशय वाटत आहे तुम्ही लवकर भद्रावती येथे या असे सांगीतल्याने मि नागपुर येथुन भद्रावती येथे दुपारी ०१/०० वा दरम्यान पोहचलो असता. माझा घराचे समोरचा दरवाजाचा ताला तोडुन दरवाजा उघडे दिसले बेड रूममधील आलमारी मधील कपडे व सामान अस्त व्यस्त फेकलेले दिसले. आलमारीचे लॉकरमध्ये नगदी ७१,५,००/- रू ठेवलेले चोरून नेले आहे तरी अज्ञात चोरा विरूध्द पोस्टे रिपोर्ट दिल्याने पोस्टे अप क. २९०/०२५ कलम ३०५ (अ), ३३१ (३),३३१ (४) भा.न्या.स नोद करून तपासात घेतलासदर गुन्हयाचे पुढील तपासामध्ये मुखबीरव्दवारे खबर प्राप्त करून अतीशय अल्पशा कालावधी मध्ये आरोपी नामे १) धनेंद्र संगराज पिपलांगे वय १९ वर्ष धंदा मजुरी जात महार रा. भगतसिंग वार्ड बल्लारपुर जि चंद्रपुर २) अमन उर्फ टिंगु इंद्रकुमार निषाद वय १९ वर्ष धंदा मजुरी जात केवट रा. भगतसिंग वार्ड बल्लारपुर जि चंद्रपुर यांना सदर गुन्हयात अटक करून त्यांचे कडुन गुन्हयातील चोरीस गेलेले रोख रक्कम मधील आरोपीनी खाण्यापिण्यात खर्च केल्याचे सांगुन त्यापैकि ९२५०/- रूपये बाकि असल्याचे सागीतल्याने त्याचेकडुन उर्वरीत रक्कम जप्त केलेला आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री सुदर्शन मुमक्का सा., मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. ईश्वर कातकडे, मा. उपविभागीय पोलीस अधीकारी श्री सुधाकर यादव सा., मा. पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी पोलीस ठाणे भद्रावती यांचे मार्गदर्शनात गुन्हे शोध पथक ग्रे. पोउपनि गजानन तुपकर सा, महेंद्र बेसरकर, जगदिश झाडे अनुप आष्टुनकर विश्वनाथ चुदरी, योगेश घाटोळे, खुशाल कावळे यांनी केली आहे.
0 comments:
Post a Comment