बल्लारपूर :
बल्लारपूर रेल्वे स्थानकावर आज (३० ऑगस्ट) दुपारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. मुंबईहून येणाऱ्या नंदीग्राम एक्स्प्रेस (गाडी क्रमांक ११००१) मध्ये एका प्रवाशाने शौचालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली. sucide
Passenger hangs himself in railway toilet – stir at Ballarpur railway station
सुमारे दुपारी १.२० वाजता नंदीग्राम एक्स्प्रेस बल्लारपूर स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ०५ वर पोहचली. गाडीची नेहमीप्रमाणे सी अँड डब्ल्यू विभाग मार्फत अंतर्गत तपासणी सुरू असताना कोच क्रमांक एस-३ मधील उजव्या बाजूचे शौचालय आतून बंद असल्याचे आढळले.
स्वच्छता कर्मचाऱ्यांनी दार उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र दार उघडले नाही. त्यानंतर ही माहिती तात्काळ स्टेशन प्रबंधक बल्लारपूर यांना देण्यात आली. रेल्वे प्रशासनाने तत्काळ दार उघडून पाहिले असता, आत एका प्रवाशाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, मृत प्रवाशाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे काही वेळासाठी रेल्वे स्थानक परिसरात खळबळ उडाली होती.
0 comments:
Post a Comment