भद्रावती | प्रतिनिधी जावेद शेख:-
भद्रावती तालुक्यातील मांगली नाल्यातून अवैध रेती वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर महसूल विभागाच्या गौण खनिज पथकाने कारवाई केली. ही कारवाई शनिवार, दिनांक ३० ऑगस्ट रोजी पहाटे साडेचार वाजता करण्यात आली.Illegal Sand Transport
“Illegal Sand Transport: Tractor Seized in Revenue Department Crackdown”.
गोपनीय माहितीच्या आधारे मानोरा गावाजवळ पथकाने सदर ट्रॅक्टरचा पाठलाग करून शहरातील जुना बस स्टॉप, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळ त्याला अडविले. तपासणीदरम्यान ट्रॅक्टर मालकाकडे कोणताही परवाना नसल्याचे आढळून आले.
सदर ट्रॅक्टर क्रमांक एमएच-34 के 7360 व ट्रॉली क्रमांक एमएच-34 सीए 2897 हे रितिक संतोष रामटेके यांच्या मालकीचे असल्याचे समजले. ट्रॅक्टर जप्त करून तहसील कार्यालयात जमा करण्यात आला असून, पुढील कारवाई महसूल विभागाकडून सुरू आहे.
या कारवाईत तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या नेतृत्वाखाली ग्राम महसूल अधिकारी खुशाल मस्के व मंडळ अधिकारी दडमल यांनी सहभाग घेतला.
0 comments:
Post a Comment