Ads

शेतीच्या कर्जबारीपणामुळे वृध्द शेतकऱ्याची आत्महत्या. शेगाव खुर्द येथील घटना.

जावेद शेख भद्रावती प्रतिनिधी:-
डोक्यावर शेतीच्या थकीत पिक कर्जाची रक्कम व कर्जफेडीची असमर्थता या विवंचनेत एका ६२ वर्ष वृध्द शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील शेगाव खुर्द येथे दिनांक ३० ला सकाळी उघडकीस आली.
Elderly farmer commits suicide due to his indebtedness to the farmer. नामदेव कवडू गायकवाड, वय६२ वर्ष, राहणार शेगाव खुर्द असे या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.स्वतःच्या शेतात आंब्याच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन त्यांनी आपले जिवन संपविले.सदर मृत शेतकऱ्याकडे शेगाव येथे ६.८० हेक्टर शेती आहे.त्यात त्यांनी यावर्षी सोयाबीन व कपाशीच्या पिकाची लागवड केली आहे.मात्र त्यांच्या डोक्यावर शेगाव येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे एक लाखावर कर्ज असुन ते अनेक दिवसांपासून थकीत आहे.या विवंचनेतुनच त्यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शेगाव पोलीस तथा महसूल कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला.घटनेचा पुढील तपास शेगाव स्टेशनचे ठाणेदार योगेंद्रसिंग यादव यांच्या मार्गदर्शनात पीएसआय सुमित कांबळे करीतआहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment