भद्रावती | प्रतिनिधी जावेद शेख:-
भद्रावती पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या जबरी चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघड केला आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दि. 28 ऑगस्ट 2025 रोजी गुन्हेगार शोध मोहीम व पेट्रोलिंगदरम्यान खात्रीशीर माहितीवरून कारवाई करण्यात आली.
Local Crime Branch: Crime of forced theft exposed
या प्रकरणी भद्रावती अप. क्र. 348/25, कलम 309(4) भा.न्या.स. अन्वये दाखल गुन्ह्यात आरोपीस ताब्यात घेण्यात आले. आरोपीचे नाव –
शिवनारायण उर्फ मनिष बलराम हरिनखेडे (वय 25 वर्ष, रा. मदनपूर, ता. वारशिवनी, जि. बालाघाट, मध्यप्रदेश).
तपासादरम्यान चौकशी केली असता आरोपीने भद्रावती पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याच्या ताब्यातून गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जप्त मुद्देमाल :
1. होंडा शाइन मोटारसायकल (MH 34-CA-0920) – किंमत 85,000/- रु.
2. विवो कंपनीचा मोबाईल फोन – किंमत 5,000/- रु.
एकूण मुद्देमाल : 90,000/- रुपये
जप्त मुद्देमालासह आरोपीस पुढील तपासासाठी भद्रावती पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मु. मक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
या मोहिमेत API बलराम झाडोकर, PSI सर्वेश बेलसरे, पो.ह.वा. जयसिंग, संतोष येलपुलवार, नितीन रायपुरे, मिलिंद जांभुळे, दिनेश अराडे, सचिन गुरनुले, गणेश मोहुर्ले, शशांक बदामवार या स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरच्या पथकाचा सहभाग होता
0 comments:
Post a Comment