भद्रावती | प्रतिनिधी जावेद शेख:-
भद्रावती तालुक्यातील मानोरा फाटा गावाजवळ अवैध वाळू तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर भद्रावती पोलिसांनी कारवाई केली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून ट्रॅक्टर पकडला.
Bhadravati police action against tractor carrying illegal sand smuggling
शनिवारी (दि. 30 ऑगस्ट 2025) पहाटे चार वाजताच्या सुमारास मांगली नाल्यातून अवैधरीत्या वाळू काढून भद्रावतीकडे आणली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार मांगली रोडवर ट्रॅक्टर येताना दिसताच थांबवून विचारपूस केली असता वाळू वाहतुकीसाठी कोणताही परवाना नसल्याचे आढळले. चौकशीत ही रेती मांगली नाल्यातून आणल्याची कबुली मिळाली.
पोलिसांनी सदर कारवाईदरम्यान 5,000 रुपये किमतीची रेती, तस्करीसाठी वापरलेले महिंद्रा 475 कंपनीचे लाल रंगाचे ट्रॅक्टर (एमएच 29 व्ही 1713) व ट्रॉली किंमत 4 लाख रुपये असा एकूण 4 लाख 5 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी ट्रॅक्टर मालक अक्षय अशोक बोडेकर व ड्रायव्हर राजू पुरुषोत्तम शिरपूरकर (रा. मांगली) यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मु. मक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय अधिकारी वरोरा संतोष बाकल, ठाणेदार योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय. प्रियंका गेडाम, पो.ह. जगदीश झाडे, विजय उपरे, संतोष राठोड, योगेश घुगे यांनी केली.
0 comments:
Post a Comment