चंद्रपूर | प्रतिनिधी :-
चंद्रपूर शहर पोलिसांनी मोटारसायकल चोरी प्रकरणात चौघा आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. Motorcycle theft
Fourth accused stuck in motorcycle theft case; 57 thousand rupees worth of goods seized
फिर्यादी महेश गौतम काळे (वय ३६, रा. माता नगर भिवापूर वार्ड, चंद्रपूर) यांनी २० ऑगस्ट रोजी पोलिसात तक्रार दिली होती की, त्यांच्या हिरो होंडा स्प्लेंडर (क्र. एम.एच. ३४-यू-५२१४) मोटारसायकलची चोरी झाली आहे. सदर वाहनाची किंमत अंदाजे १५ हजार रुपये इतकी होती.
तक्रारीवरून शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासा दरम्यान गोपनीय माहिती मिळाल्यानंतर आरोपी सुमीत शांताराम अमराजवार (२८), तनवीर कादिर बेग (२५) या दोघांनी मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर आरोपी सत्तार शम्मी खान (३२, रा. पडोली) याने ग्रॅन्डर कटर मशीनच्या सहाय्याने मोटारसायकलचे तुकडे केल्याचे समोर आले. काही तुकडे त्याने स्वतःजवळ ठेवले तर काही आरोपी जाकीर कासम शेख (३१) याच्याकडे दिल्याचे उघड झाले.
पोलिसांनी या आरोपींकडून –
चोरीस गेलेल्या हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकलचे तुटलेले तुकडे (किंमत १५,००० रु.)एक जुनी डिलक्स मोटारसायकलचे तुकडे (किंमत ४०,००० रु.)लोखंड कापण्याची ग्रॅन्डर कटर मशीन (किंमत २,००० रु.)असा एकूण ५७,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पो.नि. निशिकांत रामटेके यांच्या नेतृत्वात सपोनि. राजेंद्र सोनवणे, दत्तात्रय कोलते, विलास निकोडे तसेच डी.बी. पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.
सदर प्रकरणाचा पुढील तपास पो.अं. कपुरचंद खरवार करीत आहेत.
0 comments:
Post a Comment