कोरपना - श्रावण महिन्यातील पारंपारिक उत्सव म्हणून प्रसिद्ध असलेला मंगळागौर सांस्कृतिक महोत्सव युवा प्रतिष्ठान व विजयराव बावणे मित्रपरिवार , कोरपना यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवार दिनांक २४ रोजी श्रीकृष्ण सभागृह , कोरपना येथे मोठ्या उत्साहात पार पडला“Phugadi–Zhimyani echoed in Korapna’s Mangalagaur Festival”
महिलांच्या सहभागाने रंगतदार झालेल्या या महोत्सवात प्रश्नमंजुषा, मंगळागौर सांस्कृतिक समूह नृत्य , गायन, सोलो डान्स, ग्रुप डान्स , विविध खेळ यांच्या बहारदार सादरीकरणाने कार्यक्रमात चांगलीच रंगत आणली.
महोत्सवात महिलांनी फुगडी , झिम्मा भरड्या, पोशंपा सारखे पारंपरिक खेळ खेळले. महिलांनी गडगडाटी टाळ्या आणि गाणी गात वातावरण आनंदमय करून भारावून टाकले होते.
याप्रसंगी कोरपना च्या नगराध्यक्ष नंदाताई बावणे , राजुरा पंचायत समितीच्या माजी सभापती कुंदा जेनेकर, ज्योती रेगुंडवार , मालती बोडखे , सुनिता गिरसावळे, धुमाळ आदी प्रामुख्याने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक. चारुलता बावणे संचालन रेवती लोडे , लीना गिरटकर तर आभार विशाखा गिरसावले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी प्रभा गिरटकर , वंदना वरभे ,
कल्याणी बावणे, प्रियंका खनके, विद्या खाडे , जया नागपुरे, पायल गिरडकर, प्रिया मोहितकर, प्रीती बुटले, स्मिता बुराण , पल्लवी मालेकरं, सोनु तिजारे,आडकिनेताई, गभणे ताई , उज्वला धारणकर, अश्विनी आस्वले सह
युवा प्रतिष्ठान व विजयराव बावणे मित्र परिवार सदस्य यांनी मोठे परिश्रम घेतले. महोत्सवात महिलांची हजारोंच्या संख्येत उपस्थिती होती. सहभागी महिलांना यावेळी पारितोषिक देण्यात आली.
0 comments:
Post a Comment