चंद्रपूर :-शहर जिल्हा स्टेडियममधील जलतरण तलावात प्रशिक्षक म्हणून काम करणा_या श्रीकांत बल्की यांनी प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांशी केलेल्या गैरवर्तनामुळे स्पर्धे दरम्यान शालेय विद्यार्थ्याचे नुकसान झाले आहे. येथे आलेल्या दुस_या स्विमींग प्रशिक्षकाशी झालेल्या वादात शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमकी दिल्यामुळे प्रशिक्षक श्रीकांत बल्की वर कार्रवाई करण्याची मागणी आयोजित पत्रकार परिषदेत राकेश कुमार रॉय आणि पालक अनिल झाडे यांनी केली आहे.
सध्या श्रीकांत बल्की आणि राकेश कुमार रॉय दोघेही जिल्हा स्टेडियमच्या स्मिमींग पुल येथे प्रशिक्षणार्थींना पोहण्याचे प्रशिक्षण देतात. जिल्हा स्टेडीअम वर जिल्हास्तर वर आणि महानगरपालिके कडून आंतरशालेय जलतरण स्पर्धा सुरू आहे. येथे, खेळाडू विद्यार्थ्यांची शासन मार्फत नोंदणी करण्यात आली आहे. रविवार २४ ऑगस्ट रोजी शहरातील एका शाळेतील 13 वर्षीय विद्यार्थ्याची जलतरण स्पर्धा होती. शाळेने या स्पर्धेसाठी विद्यार्थ्याची ऑनलाइन नोंदणी केली होती. परंतु रविवारी हा विद्यार्थी स्पर्धेसाठी स्विमिंग पूलमध्ये पोहोचला आणि स्पर्धेची तयारी करत होता. तेव्हा प्रशिक्षक बल्की यांनी स्पर्धा पोर्टलवर त्याचे नाव नोंदणीकृत नसल्याने तो स्पर्धेत सहभागी होऊ शकत नाही असे सांगून विद्यार्थ्याला निराश केले. यादरम्यान, शाळेचे शिक्षक, प्रशिक्षक राकेश रॉय प्रशिक्षक श्रीकांत बल्की यांच्याकडे पोहोचले आणि कारण विचारले असता, बल्की यांनी दोघांनाही शिवीगाळ केली आणि मारण्याची धमकी दिली असल्याचा आरोप राकेशकुमार रॉय यांनी पत्रकार परीषदेत केला. यादरम्यान, प्रशिक्षक बल्की यांच्या चुकीच्या वर्तनामुळे पालक अनिल झाडे यांनी पत्रकार परिषदेत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पत्रकार परीषदेत राकेश कुमार रॉय, अनिल झाडे, मंजुषा झाडे, सुनीता टोंगे, पल्लवी वानखेडे हे उपस्थित होते.
-----------------------------
0 comments:
Post a Comment