Ads

प्रा. डॉ ज्ञानेश हटवार व डॉ. प्रशांत पाठक "बेस्ट टीचर ऑफ द इयर 2025" या पुरस्काराने सन्मानित....

भद्रावती (जावेद शेख):-
"हिंदुस्तान बुक ऑफ रेकॉर्ड" मार्फत दिला जाणारा "टीचर ऑफ द इयर २०२५" हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार महाराष्ट्रातील  चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील प्रा. डॉ ज्ञानेश हटवार व प्रा. डॉ. प्रशांत पाठक यांना जयपूर येथे झालेल्या भव्यसमारोहात प्रदान करून सन्मानित करण्यात आले. 
Prof. Dr. Gyanesh Hatwar and Dr. Prashant Pathak honored with "Best Teacher of the Year 2025" award....
"हिंदुस्तान बुक ऑफ रेकॉर्ड' जयपूर राजस्थान ही संस्था देशभरातील विविध राज्यातील निवडक १०० शिक्षकांना त्यांच्या शैक्षणिक कार्यातील विशेष योगदानाबद्दल "बेस्ट टीचर ऑफ द इयर"  राष्ट्रीय स्तरावरील हा भव्य पुरस्कार प्रदान करते. देशभरातील विविध राज्यातील सर्व श्रेष्ठ १०० शिक्षकांची या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यात प्रा. डॉ. ज्ञानेश हटवार व प्रा. डॉ. प्रशांत पाठक भद्रावती हे महाराष्ट्रातील दोघेच  या पुरस्कारासाठी निवडले गेले.

हिंदुस्तान बुक ऑफ रेकॉर्ड मार्फत दिला जाणारा हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार बाल मुकुंद आचार्य एम एल ए जयपुर तसेच अभिषेक सोनी चीफ एडिटर ऑफ हिंदुस्तान बुक ऑफ रेकॉर्ड व मान्यवरांच्या हस्ते जयपूर येथील भव्य समारोहात प्रदान करण्यात आला.
 
प्रा. डॉ ज्ञानेश हटवार व डॉ. प्रशांत पाठक हे चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी भद्रावती येथे कार्यरत आहेत. त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील विषेश योगदानाबद्दल त्यांना मिळालेल्या या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारासाठी भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे अध्यक्ष, डॉ विवेक शिंदे, सचिव, प्रा. डॉ. कार्तिक शिंदे, सहसचिव, प्रा. डॉ विशाल शिंदे, संस्थेचे विश्वस्त श्रीमती नीलिमाताई शिंदे, माजी प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे, प्राचार्य डॉ. सुधीर मोते, समस्त प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.  त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल शिक्षण क्षेत्रातील विविध संघटना व समाजातील प्रतिष्ठित नागरिकांनी सुद्धा त्यांचे अभिनंदन केले.

या मिळालेल्या शिक्षक पुरस्काराबद्दल प्राध्यापक डॉ. ज्ञानेश हटवार व डॉ. पाठक यांनी हा पुरस्कार आई वडील व संस्थेचे संस्थापक स्व. निळकंठरा शिंदे, संपूर्ण व्यवस्थापन मंडळ आणि माझे सर्व सहकारी मित्र व विद्यार्थ्यी यांनी दिलेल्या सहकार्यामुळेच प्राप्त झाल्याचे मत व्यक्त केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment