चंद्रपूर :
राहमतनगर ईराई नदी घाटावर अंत्यसंस्कार व्यवस्था पाहणाऱ्या शांती धाम संस्थेत भ्रष्टाचार आणि महिला छळवणुकीचे गंभीर आरोप समोर आले आहेत. लाकडाचा टॉल चालविणारी स्नेहा गर्गलवार हिने पत्रकार परिषदेत संस्थेचे कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांविरोधात धक्कादायक खुलासे केले.
Corruption in Shanti Dham Institute?
स्नेहा गर्गलवारचे वडील नरेंद्र गर्गलवार यांच्या नावाने संस्थेशी करार करून लाकडाचा टॉल सुरू होता. मात्र संस्थेतील कर्मचारी हरीश गोडे याने कारस्थान रचल्यामुळे झालेल्या मानसिक तणावामुळे नरेंद्र गर्गलवार यांचा नोव्हेंबर २०२४ मध्ये मृत्यू झाला. त्यानंतर स्नेहा हिने व्यवसाय स्वतः हाती घेतला.
स्नेहा हिने सांगितले की, “मी व्यवसाय प्रामाणिकपणे चालवते, तरी हरीश गोडे माझ्यावर वाईट नजर ठेवतो, मजुरांना धमकावतो आणि माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून मला छळतो.” हरीश गोडेवर पूर्वीही विनयभंगाचा गुन्हा नोंद असल्याची माहिती समोर आली. तरीही संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक वासलवार आणि सचिव घनशामसिंह दरबार यांच्याकडून त्याला पाठबळ मिळत असल्याचा आरोप आहे.
याशिवाय, गर्गलवार कुटुंबीयांचा करार न्यायालयात प्रलंबित असताना स्थगिती आदेश असूनही संस्थेने टॉल बंद करण्याचे पत्र दिले. न्यायालयाचा अवमान करून स्नेहाच्या व्यवसायात अडथळे आणले जात असल्याचा आरोप करण्यात आला. पोलिसांकडे तक्रारी करूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याचे स्नेहाने सांगितले.
मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी संस्थेतील गैरव्यवहार उघड करताना सांगितले की, १९९६ ते २०२० दरम्यान संस्थेचे ऑडिट झाले नाही. रथ, बँड, मेटाडोर यांचे दर मनमानी वाढवून मृतकांच्या कुटुंबियांकडून अतिरिक्त रक्कम वसूल केली जाते. कोट्यवधी रुपयांची उलाढाल होऊनही हिशेब नाही, असा आरोप त्यांनी केला.
👉 त्यामुळे संस्थेचे अध्यक्ष, सचिव, कर्मचारी हरीश गोडे आणि इतरांवर महिला अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी स्नेहा गर्गलवार हिने केली आहे.
0 comments:
Post a Comment