जावेद शेख प्रतिनिधी भद्रावती :-
पंचायत समिती भद्रावतीच्या वतीने पंचायत समिती सभागृहात कृषी दिनाचा व हरीत क्रांतीचे प्रणेते स्व.वंसतराव नाईक यांचा जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला.
Bhadravati Panchayat Samiti celebrates Agriculture Day and the birth anniversary of Vansatrao Naik, the pioneer of Green Revolution
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सहा.गटविकास अधिकारी डॉ.बंडुआकनुरवार , प्रमुख अतिथी तालुका कृषी अधिकारी सुुशिल आडे, कृषी अधिकारी महेंद्र डाखरे, कृषी केंद्र संचालक अभिजीततन्नीरवार,विस्तार अधिकारी प्रकाश पारखी,प्रणाली भागवत, एपीओ सुरज खोडे,अमोल पोटे होते.प्रथम स्व.वंसतराव नाईक यांच्या प्रतिमेस द्विपप्रजल्वन मालार्पण करण्यात आले.गट विकास अधिकारी आशुतोष सपकाळ यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी डॉ.बंडुआकनुरवार यांनी राज्यात कृषी दिन माजी मुख्यमंत्री हरीत क्रांतीचे प्रणेते स्व.वंसतराव नाईक यांच्या जन्मदिनी साजरा करण्यात येत असून आपल्या कृषी प्रधान देशात कृषी संस्कृतीचे स्मरण व शेतकर्याविषयी कृतज्ञता म्हणून साजरा करण्यात येत असल्याचे सांगीतले. सुशील आडे यांनी शासनाच्या कृषी विभागाच्या विविध योजनांची माहीती दिली. महेंद्र डाखरे यांनी जागतिक कृषीतज्ज्ञ स्व.वंसतराव नाईक यांची शेती आणि मातीवर असीम श्रध्दा होती याच दिवशी शेतकऱ्यांचा शासनाकडून सन्मान केला जात असल्याचे मनोगतात व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी अधिकारी महेंद्र डाखरे संचालन प्रमोद ढोरे आभार प्रदर्शन कु. प्रणाली खिराळे यांनी केले.कार्यक्रमाला कृषी विस्तार अधिकारी, पंचायत विस्तार अधिकारी,सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, कृषी सहाय्यक व शेतकरी उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment