चंद्रपूर ;-स्थानिक आमदार जोरगेवार यांनी केवळ त्यांच्या व्यावसायिक मित्राचे घर आणि स्वत:चे प्लाट नाल्यापासून वाचवण्यासाठी 95 लाखांच्या सरकारी निधीतून सुरक्षा भिंत बांधली आहे. ही गंभीर बाब आहे. आमदार मुनगंटीवार यांच्याकडे तक्रार केली असता गुरूवार ला विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. परंतु याचे उत्तर देताना जलसंधारण मंत्र्यांनी टाळाटाळ केली आणि जोरगेवार यांनी खोटी माहिती देऊन विधानसभा अध्यक्षांची दिशाभूल केल्याचा आरोप केला असल्याचा आरोप करत आमदार जोरगेवार यांनी पदाचा राजीनामा द्यावा, प्रकरणाची एसआयटी चौकशी, दोषींकडून ९५ लाख रुपये वसूल करण्याची मागणी आप जिल्हाध्यक्ष मयुर राईकवार यांनी पत्रपरिषदेच्या माध्यमातुन केली आहे.
पत्रकार परिषदेत रायकवार यांनी सांगितले की, या प्रकरणासंदर्भात जलसंधारण विभाग आणि जिल्हा दंडाधिकारी, दक्षता गुणवत्ता नियंत्रण पथक यांच्याकडे तक्रार सादर करण्यात आली आहे. तक्रारीच्या आधारे, जलसंधारण विभागाने चौकशी करून अहवाल सादर केला ज्यामध्ये गंभीर बाबी समोर आल्या आहेत. अहवालात असे सांगण्यात आले आहे की, ही सुरक्षा भिंत झोपडपट्टीवासीयांसाठी नव्हे तर आमदाराच्या मित्राच्या घरासाठी बांधण्यात आली आहे. नाल्याची मूळ रुंदी ८ मीटर होती, नाल्यावर अतिक्रमण करून भिंत बांधण्यात आली त्यामुळे नाला आता ४ ते ५ मीटर झाला आहे. आमदारांनी या कामाची शिफारस केल्याचे सांगण्यात आले. नाल्यामुळे शहरातील इतर भागांनाही पुराचा फटका बसतो, परंतु आमदार जोरगेवारांचे त्याकडे दुर्लक्ष आहे असाही आरेाप करण्यात आला. मित्राचे घर आणि त्यासमोरील त्यांचा भूखंड वाचवण्यासाठी 95 लाख रुपयांची भिंत बांधणे ही गंभीर बाब आहे. दुसरीकडे, बांधकामामुळे विद्यमान वस्ती धोक्यात आली आहे अशी माहीती जलसंधारण विभागाने दिली असल्याची माहीती राईकवार यांनी दिली. या भिंतीच्या बांधकामासाठी महापालिकेची परवानगी घेण्यात आली नसल्याची माहीती जलसंधारण विभाग ने दीली आहे अशी माहिती रायकवार यांनी दिली. गुरुवारी, आमदार सुधीर मुनगंटीवार आणि विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला तेव्हा जलसंपदा मंत्र्यांनी जिल्हा दंडाधिकारीमार्फत चौकशी करण्याचे टाळाटाळ करणारे उत्तर दिले आणि आमदार जोरगेवार यांनी विधानसभेत सभापतींची दिशाभूल केल्याचा आरोप राईकवार ने केला. झोपडपट्टीवासीयांनी भिंतीचे बांधकाम करण्याची मागणी केली होती अशी खोटी माहिती देऊन ते विधानसभेत अध्यक्षांची दिशाभूल केली आहे.
या संदर्भात, आपचे जिल्हाध्यक्ष मयूर रायकवार यांनी पत्रपरिषदेद्वारे स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांचा आमदारपदाचा तात्काळ राजीनामा, तत्कालीन कार्यकारी अभियंता बहुरिया यांचे तात्काळ निलंबन, संपूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशी, संबंधित दोषींकडून 95 लाख रुपये वसूल करणे, सर्व सरकारी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करणे, नाल्याची मूळ रुंदी पूर्ववत करणे आणि नाल्याचे पुनर्संचयित करणे अशी मागणी केली आहे.
पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष मयूर रायकवार, सुनील मुसेले, राजू कुकडे, बोपचे उपस्थित होते.
-----------------------------------
0 comments:
Post a Comment