चंद्रपूर, दि. ०२ जुलै २०२५ –
चंद्रपूर शहरातील बाबुपेठ परिसरात भर पावसाळ्यात सुरू असलेले सिव्हरेजचे खोदकाम नागरिकांसाठी त्रासदायक ठरत असून, यामुळे अनेक रस्ते पूर्णतः बंद झाले आहेत. या खोदकामामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी महानगरपालिकेला निवेदन देऊन काम तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे.
Sewerage work underway during heavy monsoons should be stopped immediately – Aam Aadmi Party demands
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, रस्त्यावर झालेले खड्डे अपघाताला आमंत्रण देत असून, यामध्ये शाळकरी विद्यार्थी, महिला व वृद्ध नागरिक यांना इजा झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. तसेच, पावसामुळे हे काम निकृष्ट दर्जाचे होत असून, नव्याने तयार करण्यात आलेल्या चेंबरांना भेगा पडत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले आहे.
आम आदमी पार्टीने पुढील तीन प्रमुख मागण्या मांडल्या आहेत:
1. भर पावसाळ्यात सुरू असलेले सिव्हरेजचे काम तात्काळ थांबवावे.
2. खोदकामामुळे निर्माण झालेले खड्डे त्वरित बुजवून वाहतूक सुरळीत करावी.
3. काम पूर्ण झालेल्या भागात दर्जेदार काँक्रीटीकरण करावे.
या मागण्या दोन दिवसांत मान्य न झाल्यास आम आदमी पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राजू कुडे यांनी दिला आहे.
0 comments:
Post a Comment