चंद्रपूर :स्वत:वर प्राणघातक हल्ला होऊनही, आरोपी आणि त्याचे साथीदार अजूनही परिसरात उघडपणे फिरत आहेत. आरोपींकडून जीवाला धोका असल्याची माहिती रामनगर पोलिसांना देऊनही, आरोपींवर कारवाई करण्यास दिरंगाई करत आहेत. आरोपींच्या भीतीमुळे कुटुंबातील सदस्यांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. भविष्यात जीवाला धोका निर्माण झाल्यास पोलिस प्रशासन आणि मुख्य आरोपी आणि सहकारी जबाबदार असतील. या संदर्भात पीडित जगदीश बिस्वास यांने पत्रकार परिषदेद्वारे पोलिस प्रशासनाकडे या प्रकरणाचा तपास एलसीबीकडे सोपवावा आणि आरोपींना अटक करावी अशी मागणी केली आहे.
पीडित जगदीश यांनी सांगितले की, तो मजूर म्हणून काम करतो. ११ जून रोजी बंगाली कॅम्प परिसरातील शाम नगर भगतसिंग चौकात किरकोळ वादातून आरोपी राजू ढाली आणि त्याच्या तीन साथीदारांनी दारूच्या नशेत त्याच्या गळ्यावर आणि हातावर वस्तरा ने हल्ला केला. त्यानंतर त्याला 13 जूनपर्यंत सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यादरम्यान त्याची पत्नी ज्योती बिस्वास यांनी रामनगर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीत चार आरोपी राजू ढाली उर्फ राजू बिल्डर, रॉबिन बिस्वास, प्रकाश अधिकारी आणि सुबल मंडल यांची नावे होती. परंतु पोलिसांनी फक्त एकाच आरोपी राजू ढालीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीची एफआयआर कापी देण्यास पोलिसांनी नकार दिला. इतर तीन जणांना या प्रकरणापासून दूर ठेवण्यात येत आहे. या संदर्भात एसपींना भेटल्यानंतर तपास अधिकारी पीएसआय बागडे यांना चौकशीचे आदेश देण्यात आले. परंतु आतापर्यंत तपास पुढे सरकला नाही आणि आरोपींना अटकही करण्यात आलेली नाही. आमदार मुनगंटीवार, पालकमंत्री डॉ. उईके यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांकडून साक्षीदारांवर दबाव आणला जात आहे. जगदीश बिस्वास यांनी रामनगर पीएसआय बागडे यांच्यावर आरोपींना वाचवण्यासाठी आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप केला आहे. पोलीस राजू ढाली ला आरोपी दाखवून वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. मुख्य आरोपी आणि इतर 3 जण खुलेआम चाकू घेऊन परिसरात फिरत असल्याचा आरोपही करण्यात आला. आरोपींच्या भीतीमुळे पत्नी आणि मुलांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. भविष्यात राजू ढाली आणि त्याच्या 3 सहका_यांकडून जीवाला धोका आहे आणि जीवाचे बरे वाईट झाल्यास पीएसआय बागडे, पोलिस प्रशासन आणि आरोपी यासाठी जबाबदार असतील. या प्रकरणाचा तपास एलसीबीकडे सोपवून आरोपींना अटक करण्याची मागणी पीडित जगदीश बिस्वास यांनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे. पत्रकार परिषदेत जगदीश बिस्वास आणि ज्योती बिस्वास उपस्थित होते.
-----------------------------------
0 comments:
Post a Comment