जावेद शेख प्रतिनिधि भद्रावती:-
श्री. विठ्ठल मंदिर देवस्थान कमिटी ,किल्ला वार्ड,भद्रावती तर्फे आषाढी एकादशी महोत्सवाच्या निमित्ताने विठ्ठल मंदिर येथे दिनांक 6 जून रविवारला सकाळी साडेनऊ ते अकरा पर्यंत विठ्ठल रखुमाई मूर्तीची महापूजा व अभिषेक आयोजित करण्यात आलेला आहे.
Vitthal Rakhumai Palkhi procession and consecration at Bhadravati
माजी मंत्री तथा आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते महापूजा व अभिषेक संपन्न होणार आहे. तसेच रात्री साडेआठ वाजता कीर्तनाचा कार्यक्रम ह .भ .प .सुवर्णाताई प्रकाश पिंपळकर व संघ भद्रावती हे सादर करणार आहेत . दिनांक सात जुलै सोमवारला सकाळी साडेनऊ वाजता विठ्ठल रखुमाई पालखीची शोभायात्रा निघणार आहे .विठ्ठल मंदिर देवस्थान पासून वाल्मीक चौक, जुना बस स्टँड ,गांधी चौक, विठ्ठल मंदिर या मार्गाने ही शोभायात्रा निघणार आहे. या शोभायात्रेचे उद्घाटक म्हणून खासदार प्रतिभाताई धानोर कर आमदार करण देवतळे, माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर ,तहसीलदार राजेश भांडारकर, ठाणेदार योगेश पारधी, न .प.मुख्याधिकारी डॉक्टर विशाखा शेळके, गटशिक्षणाधिकारी डॉक्टर प्रकाश महाकाळकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बळवंतराव गुंडावार ,मनोहर राव पारधे तसेच सुषमाताई शिंदे उपस्थित राहणार आहेत.
शोभायात्रेत 13 ते 15 भजन मंडळ सहभागी होणार आहे. तसेच सकाळी 11 वाजता कीर्तन व गोपालकाला भावनाताई तन्नीरवार व संच चंद्रपूर यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.दुपारी अडीच वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या सर्व कार्यक्रमांचा आस्वाद भाविकांनी घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक चंद्रकांत गुंडावार यांनी केले आहे.
0 comments:
Post a Comment