चंद्रपूर :-चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या बाबूपेठ परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर प्रभाग, जो की दलित वस्ती म्हणून ओळखला जातो, या ठिकाणी मलनिसारण योजनेच्या अंतर्गत सुरू असलेले काम अत्यंत हलक्या दर्जाचे व निष्कृष्ट पद्धतीने केले जात असल्याची तीव्र प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
या योजनेमुळे संपूर्ण रस्ते खड्ड्यांनी भरले असून नागरिकांना अत्यंत गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर पडलेल्या खोल खड्ड्यांमुळे अनेक लहान-मोठे अपघात झाले आहेत. पावसाळ्याच्या काळात हे खड्डे पाण्याखाली जाऊन अधिक धोकादायक ठरत आहेत. नागरिकांच्या वारंवार तक्रारी असूनही महानगरपालिका प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करत आहे.
आज या अन्यायकारक आणि बेजबाबदार वागणुकीविरोधात आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष श्री. राजू कुडे यांच्या नेतृत्वात नागरिकांना सोबत घेऊन खड्ड्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या अनोख्या आंदोलनाच्या माध्यमातून नागरिकांनी आपल्या मनातील संताप व्यक्त केला.
खड्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या कंत्राटदाराची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे.”
या आंदोलनामध्ये आपचे प्रदेश सहसचिव सुनील भाऊ मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, शहराध्यक्ष योगेश गोखकरे, संघटन मंत्री संतोष बोपचे, बाबूपेठ अध्यक्ष राजू भाऊ तोडासे, अनुप तेलतुंबडे, मनीष राऊत, अजय बाथव, एकनाथ कसारे, निंबाळकरजी, रजनीताई गड्डेवार, किरण ताई कुमरवार, रावलकर ताई इत्यादी कार्यकर्ते तथा स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते व त्यांनी महानगरपालिकेच्या कामकाजाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
-
0 comments:
Post a Comment