जावेद शेख प्रतिनिधी भद्रावती :-
वनपरिक्षेत्र अंतर्गत दि. ६/७/२०२५ रोजी वनचेतना केन्द्र टेमुर्डा परिसरात मा. आमदार करणभाऊ देवतळे, भद्रावती - वरोरा निर्वाचन क्षेत्र यांचे हस्ते त्यांच्या आईच्या नावाचे फलक रोवून वृक्षारोपण करण्यात आले.
Forest Mahotsav is organized with the concept of "Ek Ped Maa Ke Naam".
सद्यस्थितीत लागवडीस उपयुक्त औषधी प्रजातीपैकी कदम, बेहडा, हिरडा, बेल व फळझाडे मौसंबी, संत्रा, बदाम, डाळिंब, पेरू, फणस, जांभुळ इत्यादी लागवड केली. परिक्षेत्रातील वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमास उपस्थित सरपंच, पोलिस पाटील, अध्यक्ष, संयुक्त वनव्यवस्थापन समिती व टेमुर्डा येथिल प्रतिष्ठित नागरिक, महिला वर्ग यांनी आपल्या आईच्या नावाने प्रत्येकी एक वृक्ष लागवड करण्यात आले. त्यासमोर प्रत्येकाच्या आईच्या नावाचे फलक रोवण्यात आले.मा. सतिश शेंडे वनपरिक्षेत्र अधिकारी वरोरा यांचे मार्गदर्शनात सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी श्री चांभारे क्षेत्र सहायक टेमुर्डा, श्री लोणकर, क्षेत्र सहायक शेगाव, श्री ढुमने वनपाल, श्री तिखट व.र. , श्री करकाडे व.र., श्री वेदांती व.र. आणि उपस्थित वनकर्मचारी, वनमजूर तसेच PRT सदस्यांनी सहकार्य केले.
0 comments:
Post a Comment