Ads

शासकीय आश्रमशाळेकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करा.

जावेद शेख प्रतिनिधी भद्रावती:-
तालुक्यातील चंदनखेडा येथील शासकीय आश्रम शाळेत जाणारा बसस्थानक ते आश्रम शाळा असा दोन किलोमीटर चा रस्ता खड्डे तथा चिखल्याने अत्यंत खराब झालेला असल्याने आश्रम शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना व इतर नागरिकांना फार त्रास सहन करावा लागत आहे.
Repair the road leading to the government ashram school.
हा रस्ता दुरुस्त करण्याचा ठराव चंदनखेडा ग्रामपंचायत तर्फे पारित करण्यात आला आहे. या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करून तो ये-जा करण्यासाठी योग्य करावा अशी मागणी चंदनखेडा ग्रामपंचायत तर्फे सरपंच नयन जांभुळे यांनी चंद्रपूर जिल्ह्याचेपालकमंत्री अशोक उईके यांना चंद्रपूर वन अकादमी येथेसादर करण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.या दोन किलोमीटर रस्त्याची जागोजागी गिट्टी उखडून खड्डे पडलेले आहेत व पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्त्यावर सर्वत्र चिखल पसरलेला असल्याने या रस्त्यावरून येणे जाणे कठीण झाले असल्याचे निवेदनातून म्हटले आहे. निवेदन सादर करताना सामाजिक कार्यकर्ते विकास धांडेउपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment