चंद्रपुर :-दिनांक ५ जुलै, २०२५ रोजी मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन गोंडपिपरी पोलीसांनी शिवाजी चौक गोंडपिपरी येथे नाकाबंदी करून एक स्विफ्ट डिझायर कार क्र. MH47-C-9684 ला थांबवून पंचासमक्ष सदर वाहनाची तपासणी केली असता त्यात अवैध रित्या देशी विदेशी दारु साठा मिळुन आल्याने सदर प्रकरणी पो.स्टे. गोंडपिपरी कलम ६५ (अ) (इ), ८३ महाराष्ट्र दारुबंदी कायदान्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. crime news
Gondpipri police arrest 2 accused for smuggling illegal domestic and foreign liquor
सदर गुन्हयात आरोपी वाहन चालक (१) उमेश विश्वनाथ राजन हिरे वय ३६ वर्ष रा. तुकूम चंद्रपूर आणि (२) किसन धोंडोजी चौधरी वय ५५ वर्ष रा. जुनोना रोड चंद्रपूर याचे ताब्यातील वाहनामधील अवैध दारु साठा (१) देशी दारु रॉकेट संत्रा च्या २ पेटया किं. ७,०००/- रु. (२) बिअर haywards 5000 च्या २० नग किं. २६००/- रु. (३) स्विफ्ट डिझायर कार क्र. MH47-C-9684 किं.४,००,०००/- रु. असा एकुण ४,०९,६००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन पुढील तपास गोंडपिपरी पोलीस करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि श्री रमेश हत्तीगोटे यांचे नेतृत्वात पोउपनि श्री कराडे, पोअं. तिरुपती, कडुकर, गव्हारे व सैनिक रियाज, दुर्योधन सर्व पो.स्टे. गोंडपिपरी यांनी केली आहे.
0 comments:
Post a Comment