राजुरा २ जुलै :-
इको क्लब फॉर मीशन लाईफ अंतर्गत "एक पेड मा के नाम २.०" व वन महोत्सव अंतर्गत नगर परिषद राजुरा येथील घनकचरा व्यवस्थापन केंद्र राजुरा येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.
"Ek Peed Maa Ke Naam" and Van Mahotsav are celebrated with enthusiasm.
यावेळी आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल राजुरा येथील राष्ट्रीय हरीत सेना, इको क्लब, स्काऊट विभाग, सामाजिक वनीकरण परिक्षेत्र राजुरा ,नगर परिषद राजुरा, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था यांनी सक्रिय सहभाग घेऊन एकाचवेळी शेकडो वृक्षांचे वृक्षारोपण केले. यावेळी सामाजिक वनीकरण परिक्षेत्र राजुराचे वनपरिक्षेत्र अधिकारी दिगंबर बल्की, वनपाल सुनील मेश्राम ,बापूराव ब्रह्मटेके ,वितेश चव्हाण, वनरक्षक संतोष काकडे , गोविंदा तम्मीवार , शितल ताकसांडे, आदर्श शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, स्काऊट मास्टर रुपेश चीडे, वैशाली चिमूरकर , विकास बावणे, नगर परिषद राजूराचे कार्यालयीन अधीक्षक संदीप वानखेडे ,पाणीपुरवठा अभियंता सुमेध खापरडे ,विद्युत अभियंता उमेश पेंदाम ,फिल्ड इन्चार्ज सुरेश पुणेकर, क्लीन शील्ड लिमिटेड प्रोजेक्ट सुपरवायझर केतन जुनघरे, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे नरेंद्र देशकर ,संतोष देरकर ,रवी बुटले, श्रीरंग ढोबळे , अंजली गुंडावार , बबीता कांबळे प्रतीक काकडे , रवी लेक्कलवार आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्तावीक बादल बेले, राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख तथा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष,नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था यांनी मानले. वनविभाग राजुरा, आदर्श शाळेच्या सेविका इंदिरा गुरनुले, नगर परिषद राजुराचे स्वच्छता कर्मचारी , सोनिया नगर चे रहवासी यांचे विशेष सहकार्य लाभले.---------------------------------------------
पर्यावरण संवर्धनात घनकचरा व्यवस्थापनाची महत्त्वपूर्ण भूमिका. - केतन जुनघरे
पहिल्यांदाच राजुरा शहरात घनकचरा व्यवस्थापन केंद्रात भेट देवुन भव्य वृक्षारोपण केल्याने मनस्वी आनंद झाला. संपूर्ण शहरातील ओला, सुका कचरा संकलित करून याठिकाणी टाकला जातो. परंतु पुढे या कचऱ्यावर कशी प्रक्रिया केली जाते याबद्दल आदर्श शाळेतील विद्यार्थांनी व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेनी पुढाकार घेऊन वृक्षारोपण, क्षेत्रभेट देऊन घनकचरा व्यवस्थापनाची माहिती जाणुन घेतली. कचऱ्यावर होणाऱ्या संपूर्ण प्रकिया, कंपोस्ट खत निर्मिती, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन आदींची माहिती दिली. पर्यावरण संवर्धनात घनकचरा व्यवस्थापनाची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे मत केतन जुनघरे, प्रोजेक्ट सुपरवायजर, क्लीन शिल्ड लिमिटेड यांनी व्यक्त केले.
0 comments:
Post a Comment