Ads

काम नाही तर , पगार नाही, देखावा, चन्द्रपूर जिल्हा सिमेंट मजदूर संघ मानीकगड च्या हाताचे बाहुले ?

गडचांदूर [तालुका प्रतिनिधि ] :- चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर स्थित माणिकगड सिमेंट कंपनीने कामगाराच्या हिताचं लढणाऱ्या कामगार संघटनाला बसस्थान घालून एका पॅकेट युनियन निर्माण करून गेल्या 35 वर्षात कधीही ही कामगार संघटना कामगाराच्या अन्याय अत्याचारासाठी समोर आल्याचा कधीच दिसून आले नाही
No work, no salary, appearance, puppets of Chandrapur District Cement Mazdoor Sangh Manikgarh?
अनेक कंपन्यांमध्ये कामगाराच्या कल्याणासाठी किंवा आपत्ती संकटात सापडलेल्या कामगारासाठी अनेक कामगार संघटना धावून जातात व कंपन्यांच्या विरोधात आवाज बुलंद करून त्या कामगाराला न्याय मिळवून दिल्या जाते एवढेच नव्हे तर अनेक कंपन्या कामगारांच्या दिवाळी बोनस साठी व कामगाराच्या अडचणी प्रसंगी कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा किंवा आंदोलनाचे शस्त्र उगारून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला मात्र माणिकगड सिमेंट कंपनीने कामगारांच्या हक्कासाठी आजपर्यंत लढाई लढून चंद्रपूर जिल्हा सिमेंट मजदूर संघ माणिकगड सिमेंट कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी कधीही कामगारांच्या हितासाठी पुढाकार घेतला नाही तर अनेक वेळा कंपनीच्या हितासाठीच काम केल्याचे आजपर्यंतचे जनतेचे व कामगाराचे अनुभव आहे नुकत्याच आदिवासी कोलाम समाजाने ठिय्या आंदोलन करत असताना कंपनी व्यवस्थापनाने या कामगार संघटनेच्या काही दलालांना हातात धरून त्यांना काम नाही तर पेमेंट नाही अशा प्रकारचं दोन दिवसाचं पडद्यामागचं नाटक कंपनी व्यवस्थापनाच्या इशाऱ्यावर ठिय्या आंदोलन समोर कामगारांनी ठिय्या मांडला मात्र खरंच दोन दिवसाचे पगार कंपनीने यांचे कपात केले का कोरोना कालावधीमध्ये दोन वर्ष काम नसताना या कामगार संघटनेने कामाचा पगार घेतला नाही का कंपनीच्या अनेक कामगारांना सुरक्षा रक्षक यांना मनात वाटेल तेव्हा काढणे गरज पडेल तेव्हा कामावर घेणे अशा अनेक घटना गेल्या दोन दशकापासून या कंपनीत घडले मात्र या कामगार संघटनेने पीडित शोषित गरीब कामगारांच्या बाबतीत पुढाकार घेऊन कंपनीच्या विरोधात आवाज बुलंद करण्याचं किंवा आंदोलन करण्याची हिंमत तरी कधी यांनी दाखवले का या ठिकाणी बनलेली चंद्रपूर जिल्हा सिमेंट मजदूर संघ हे माणिकगड सिमेंट कंपनीचे हाताचे बाहुले असून निवड यांचा वापर कंपनी विरोधात होणाऱ्या आंदोलन किंवा अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या संघटनांना दबाव गट म्हणून या कामगारांचा वापर केला जाते विशेषता आदिवास्यांची लढाई ही शासन व प्रशासनाच्या तसेच कंपनी व्यवस्थापनाच्या चुकीमुळे गेल्या आठ महिन्यांपासून चिघडले असूनयाबाबत त्या आदिवासीच्या मूलभूत अधिकार जमीन उध्वस्त झाल्याची खंत देखील या कामगार संघटनेला कधीच दिसली नाही मात्र कंपनीच्या हितासाठी चितावणी देऊन या मजदूर कामगार संघटनेचा वापर गरीब शोषित आदिवासी आंदोलनकर्त्यांच्या आंदोलन संपवण्यासाठी दबाव गटाचा वापर करीत असल्याचा आरोप आंदोलन कर्त्याचे नेते आबिद अली यांनीकेला असून ज्या उद्देशाने ही संघटना निर्माण करण्यात आली व माणिकगड सिमेंट मध्ये इतर कामगार संघटना उभ्या झाल्या नाही याचे मूळ कारणच कंपनीने एक पॅकेट युनियन तयार करून कामगारांच्या हिताऐवजी कंपनीच्या हितासाठी वापर करीत असल्याचा आरोप केला असून अधिवाशांचे आंदोलन कितीही कामगारांचा वापरकेला तरी जंगलाच्या दऱ्याखोऱ्यात राहणारा मूळनिवासी आदिवासी हा न्याय मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही या भूमिकेत गेल्या आठ महिन्या पासून ऊन थंडी पावसाच्या सरी अंगावर घेत त्या ठिकाणी ठिया मांडलेला आहे आणि तो ठिया आजही सुरू असून प्रशासन व कंपनी व्यवस्थापन उघड्या डोळ्यांनी बघत आहे मात्र त्या अत्याचार अन्यायग्रस्त आदिवासी कुटुंबांना न्याय देण्यासाठी प्रशासन व कंपनी व्यवस्थापन जाणून-बुजून शोषण करीत असल्याचा आरोपही केला आहे
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment