चंद्रपूर : अ. भा. वनवासी कल्याण आश्रमाचे द्वितीय अध्यक्ष स्वर्गीय जगदेवजी राम उरांव यांच्या पवित्र स्मृती प्रित्यर्थ बीज रोपण महोत्सव 2025 चे आयोजन विदर्भ वनवासी कल्याण आश्रम अंतर्गत जनजाती सुरक्षा मंच जिल्हा चंद्रपूर तर्फे करण्यात आले होते. दिनांक 15 जुलै रोज मंगळवार ला 11-30 वाजता इंदिरानगर मुल रोड चंद्रपूर लगत असलेल्या जंगल सुरक्षा भिंतीच्या आत लागून असलेल्या जंगलात 20,000 पेक्षा जास्त बीज रोपण करण्यात आले.
Maintaining environmental balance is the need of the hour to avoid future threats* - Dr. Deendayalji Kaware
त्यात जांभूळ, आंबा,चिकू, सिताफळ, चिंच,फणस,आवळा, मोहा,बेहडा, खजूर इत्यादी फळाचे बीज होते. सदर महोत्सवाचे उद्घाटक म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग प्रचारक डॉ. दीनदयालजी कावरे होते, तर महोत्सवाला मुख्य अतिथी म्हणून वनवासी कल्याण आश्रम चे विभाग संघटन मंत्री प्रज्योत हेपट चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी श्री. संजय पवार, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी श्री.विकास राचेर्लावार, महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश सोलापन,विदर्भ समाचार संपादक अनिल देठे, गुरुवालेजी, स्व. बापूराव वानखेडे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती आकुलवार मॅडम,जय लहरी कॉन्व्हेंट च्या मुख्याध्यापिका श्रीमती चंदाताई जीवतोडे, यांची उपस्थिती होती.महोत्सवाचे उद्घाटन भारत माता, शहीद बिरसा मुंडा,बाबुराव शेडमाके व स्व. जगदेव राम उरांव यांच्या प्रतिमेला पुष्प माला अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले.
तेव्हा वानखेडे विद्यालयातील शेकडो विद्यार्थी,शिक्षक वृंद व परिसरातील आणि शहरातील अनेक गणमान्यवर नागरिक मोठ्या संख्येनी उपस्थित होते. प्रास्ताविक करतांना जनजाती सुरक्षा मंच चे जिल्हा सह संयोजक धनराज कोवे यांनी महोत्सव आयोजन करण्याचे महत्व सांगितले त्यात विविध फळाचे ११ हजार बीज रोपण उदिष्ट होते मात्र नागरिकांना पत्रकाद्वारे आव्हान केले होते की "चला निसर्गासाठी आणि स्मृतीसाठी एक पाऊल पुढे टाकूया एक बीज एक आठवण या संकल्पनेला बळ देऊया" आप्तेष्ट,प्रिय किंवा परिवारातील व्यक्तींच्या नावे बीज अर्पण करून या पवित्र कार्यास सहभागी होऊ शकता. तर नागरिकांनी भर भरून प्रतिसाद दिल्याने ,२० हजार पेक्षा जास्त बीज गोळा झाले. त्यामुळे पुढच्या वर्षीचे उदिष्ट वाढवून १ लाख बीज रोपण करण्यात येईल असे सांगितले. उपस्थिताना उदघाटनपर उद्बोधन करतांना कावरे यांनी सांगितलं की भविष्यातील निसर्गाचे धोके टाळण्याठी सर्व नागरिकांनी प्लास्टिक चा वापर बंद करणे पाण्याचा वापर जपून करणे झाडाची कत्तल बंद करणे प्रत्येकाच्या जन्मदिना निमित्त अधिका अधिक वृक्ष लावणे आणि बीज रोपण सारखे महोत्सव आयोजित करणे हे संस्कार अंगीकारणे तर नक्की निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मदत होईल. एसडीओ पवार यांनी महोत्सवाचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांना दैनदिन जीवनात बीज रोपण करत राहण्याचा संदेश दिला. संपादक सोलापन यांनी सुद्धा सदर उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगितले व शुभेच्या दिल्या. संघटन मंत्री प्रज्योत हेपट यांनी सांगितले की जगदेवजी यांचे जीवन समाजा साठी समर्पित होते. त्यांचे कार्य स्मरणात सदैव राहवे या करिता हा महोत्सव प्रत्येक वर्षी त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त वनवासी कल्याण आश्रम करीत राहील असे समारोपीय संबोधन केले. नंतर ढोल पथक सह उपस्थित विद्यार्थ्यांनी वंदे मातरम् भारत माता की जय घोष करीत बीज रॅली काढली व जंगलच्या सुरक्षा भिंतीलगत मोठ्या संख्येनी फळाचे बीज रोपण केले तसेच अनेक विद्यार्थ्यांनी गुल्ल्यार द्वारा सिडबॉल जंगलात लांब पर्यंत फेकले या महोत्सवात इंदिरा नगर येथील वानखेडे विद्यालय,कृष्ण नगर येथील एम बी कॉन्व्हेन्ट,संजय नगर येथील जय लहरी बाबा कॉन्व्हेन्ट चे विद्यार्थ्यांनी व शिक्षक वृंद यांनी उस्फूर्तपणे भाग घेतला. महोत्सवाच्या यशस्विते साठी प्रलय सरकार,यशोधर खम्ममकर,संजय जोशी,अवताडे सर,रामराव हर्डे,चंद्रशेखर देशमुख,अनिल मने, पप्पू बोपचे,नंदू रहांगडाले,गजानन राऊत,संजय पटले,विभावरी वखरे,दीपलक्ष्मी वेखंडे,वर्षा परचाके, दीपाली जोशी, वर्षा सोमलकर,विक्रम खुबवाणी, विक्की मेश्राम,महेश शिडाम, मुकेश मेश्राम,अरविंद ननावरे, महेश तुरिले, एकनाथ चवरे,नंदू कामतवार, घनश्याम,मालू ननावरे,प्रकाश असूटकर,शुभम शेंडे,प्रवीण वाकडे, मंगेश सोनवणे अथक परीश्रम घेतले.
0 comments:
Post a Comment