Ads

श्री बालाजी नागरी सहकारी पतसंस्था राजुरा तर्फे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवनिर्वाचित संचालक सुदर्शन निमकर व विजयराव बावणे यांचा सत्कार संपन्न.

राजुरा १५ जुलै:-
तेरा वर्षानंतर अत्यंत चुरशीच्या झालेल्या आणि संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतलेल्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली. यात निवडून आलेले नवनियुक्त संचालक माजी आमदार सुदर्शन निमकर व विजयराव बावणे यांचा श्री बालाजी नागरी सहकारी पतसंस्था राजुरा तर्फे पतसंस्थेच्या कार्यालयात सत्कार करण्यात आला.
Shri Balaji Urban Cooperative Credit Society Rajura felicitated the newly elected directors of Chandrapur District Central Bank, Sudarshan Nimkar and Vijayrao Bavane.
यावेळी श्री बालाजी नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष सिद्धार्थ पथाडे , उपाध्यक्ष अभिषेक गंपावर , संचालक विलासराव बोनगीरवार ,शरीफ भाई सिद्दिकी, अनिल वेगिनवार, विलास गुंडावार, ईश्वर देवगडे, गीताताई सिद्धार्थ पथाडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. तर सदर सत्कार कार्यक्रम प्रसंगी राजू डोहे ,माजी नगरसेवक न.प.राजुरा, जगन गोप , सुरेश लेखराजनी, सिद्धार्थ रणवीर , भाऊजी वडस्कर, दिलीप भताने, चेतन वाटेकर, बँक व्यवस्थापिका दीपा येगीनवार , श्री कोंडावार , संजय काकडे यांचीही उपस्थीती होती. शॉल, श्रीफळ,पुष्पगुच्छ व मिठाई भरवून सत्कार करण्यात आला.सुदर्शन निमकर, विजयराव बावणे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment