राजुरा १६ जुलै :-
राजुरा तालुक्यातील सास्ती गावात मंगळवारी दुपारी सुमारे अडीच वाजता हृदयद्रावक घटना घडली. क्षुल्लक करणातून वाद झाला आणि मोठ्या भावाने लहान भाऊ चा खून केला आणि घटना स्थळावरून फरार झाला. परंतु राजुरा पोलिसांनी लगेच पाळत ठेवून तेलंगणात पळ काढताना कागजनगर येथून आरोपीस अटक केली.Murder
Brother killed brother.
- Accused arrested in Telangana within four hours.
सास्ती वॉर्ड क्र. १ मधील भवानी चौकात राहणाऱ्या मारोती भाऊजी भिवनकर (वय ४५ ) ,आणि दत्तू भिवनकर दोघे भाऊ असून घरगुती करणातून सकाळ पासूनच शाब्दिक वाद सुरू होता. दुपारी दोन चे सुमारास दोघेही भाऊ दारू प्यायले आणि परत वादावादी सुरू झाली. रागाचे भरात आरोपी दत्तू भाऊजी भिवनकर याने मारोती भिवनकर यांच्या डोक्यावर लाकडी दांडूक्यांनी जोरदार प्रहार केला. मार जोराचा असल्याने तो जागीच मृत झाला . त्यामुळे आरोपी दत्तू भिवनकर घटनास्थलावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच लगेच राजुरा पोलिसांनी गँभिर दखल घेऊन आरोपीच्या मार्गावर होते. त्याचा मागोवा घेत असता रात्री तेलंगणातील कागजनगर येथून अटक केली आणि राजुरा पोलीस ठाण्यात आणले. त्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे अवघ्या काही तासातच घटनेतील आरोपीस अटक केल्याने पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुंमक्का ,उप अधीक्षक ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुनील परतेकी,सहायक पोलिस निरीक्षक हेमंत पवार,सहायक निरीक्षक सुवर्णा काळे ,उपनिरीक्षक गोविंद चाटे, पांडुरंग हाके,भीष्मराज सोरते, हवालदार संदीप बुरडकर,अविनाश बांबोळे, महेश बोडगूळवार ,रवी दुबे यांनी केली.
0 comments:
Post a Comment