Ads

🚩युवासेनेची विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी गर्जना!

जावेद शेख भद्रावती:- "शिक्षण हक्क आहे, उपकार नाही!" – या जाज्वल्य भूमिकेसह युवासेनेने चंद्रपूर जिल्ह्यातील एससी, एसटी व ओबीसी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांसाठी लढाऊ पवित्रा घेतला आहे. जिल्हाप्रमुख आलेख भाऊ रट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा शिवसैनिक सुमित हस्तक यांच्या नेतृत्वात, शिवसैनिक सुरज भाऊ शाहा यांच्या प्रमुख उपस्थितीत युवासेना पदाधिकाऱ्यांनी राज्याचे शिक्षणमंत्री तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दादा भुसे यांना निवेदन सादर केले.
Shiv Sena's roar for students' rights!
निवेदनात शासनाच्या शैक्षणिक योजनांचा प्रत्यक्ष लाभ विद्यार्थ्यांपर्यंत वेळेत आणि पूर्णपणे पोहोचत नसल्याचे वास्तव अधोरेखित करण्यात आले.

निवेदनातील प्रमुख मागण्या:
1️⃣ शिष्यवृत्ती वितरणातील विलंब तातडीने थांबवावा.
2️⃣ आश्रमशाळा व वसतिगृहांची दयनीय अवस्था सुधारावी.
3️⃣ ग्रामीण व आदिवासी भागातील रिक्त शिक्षक पदे त्वरित भरावीत.
4️⃣ मागास भागांमध्ये डिजिटल शिक्षण सुविधा उपलब्ध करून द्यावी.
5️⃣ एससी/एसटी/ओबीसी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन केंद्रे व कौशल्य विकास उपक्रम सुरू करावेत.

युवासेना पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला की, "वंचित घटकांपर्यंत शिक्षणाचा हक्क पोहोचवण्यासाठी युवासेना रस्त्यावर उतरण्यास मागेपुढे पाहणार नाही."

या प्रसंगी युवासेना विधानसभा समन्वयक मुनेश्वर बदखल, वरोरा तालुका अध्यक्ष प्रणव पारेलवार, युवा शिवसैनिक पीयुष सिंग, विपुल तिवारी, निखिल मांडवकर, अभिजित थाडुरी, राज चव्हाण, संदीप चटपकर, रवी ढवस उपस्थित होते.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment