चिमूर :-९ ऑगस्ट २०२५ रोजी रक्षाबंधनच्या दिवशी झालेल्या भीषण अपघातात भारतीय सेनेतील जवान आणि एक युवकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील चिमूर–नेरी मार्गावरील रामपूर गावाजवळ सायंकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.
Indian Army jawan and youth killed in horrific accident
या अपघातात दुचाकी (बुलेट क्रमांक MH 34 BW 100) आणि ट्रॅक्टर यांची समोरासमोर धडक झाली. दुचाकीवर नागभीड तालुक्यातील मोहाडी गावातील एक युवक आणि भारतीय सेनेतील जवान अविनाश श्यामराव खेडेकर (३५) हे स्वार होते. धडकेमध्ये अविनाश यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन घटनास्थळीच त्यांचा आणि त्या युवकाचा मृत्यू झाला.
अपघातानंतर ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच चिमूर पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले, पंचनामा करून मृतदेह चिमूर उपजिल्हा सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आले. या प्रकरणाचा तपास चिमूर पोलीस करत आहेत.
0 comments:
Post a Comment