Ads

२४ तासांत विजेच्या अॅल्युमिनियम तार चोरीचा गुन्हा उघड – सात आरोपी अटक, सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

भिसी (चंद्रपूर) :
भिसी पोलिसांनी केवळ २४ तासांत विजेच्या अॅल्युमिनियम तार चोरीचा गंभीर गुन्हा उघडकीस आणत तब्बल ७ आरोपींना अटक केली आहे. यामध्ये चोरीस गेलेला १ लाख रुपयांचा माल तसेच गुन्ह्यात वापरलेली ५ लाख रुपयांची चारचाकी वाहन अशा मिळून ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. crime news
Theft of electrical aluminum wire uncovered within 24 hours – seven accused arrested, valuables worth six lakhs seized
दि. २७ ऑगस्ट रोजी नितेश गव्हारे (सुपरवायझर, समिक्षा अॅन्ड डिम्पल इलेक्ट्रिकल कंपनी, चामोशी, गडचिरोली) यांनी भिसी पोलिसांत तक्रार दाखल केली होती की, जांभुळघाट–खापरी मार्गावरील १७ पोलवरून विजेची अॅल्युमिनियम तार चोरीस गेली आहे. या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला.

घटनेच्या गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांच्या आदेशानुसार तातडीने तपास पथक तयार करण्यात आले. तपासादरम्यान मुखबिराकडून मिळालेल्या माहितीनुसार जांभुळघाट येथील आनंद नेवारे (२१), मंगेश बारेकर (२४) व कृष्णा मिटपल्लीवार (२३) यांनी चोरी केल्याचे उघड झाले. चौकशीत या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. चोरीचा माल त्यांनी रोशन हजारे (२२) व कुणाल हजारे (१९) यांना विकल्याचे समोर आले. पुढे या तारेचा व्यवहार सागर हजारे (२६) व विजय भेंडवाल (२१) यांच्या मदतीने करून तो इन्ट्रा कंपनीच्या गाडी (क्र. एमएच ३४ बीजी ९४९७) मार्फत जांभुळघाट–खापरी मार्गालगतच्या झुडपांत लपवून ठेवण्यात आला होता.

कारवाईदरम्यान पोलिसांनी चोरीची अॅल्युमिनियमची तार व सदर गाडी मिळून ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सुदर्शन मुम्मका, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी चिमुर श्री. दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कामगिरीत प्रभारी ठाणेदार सपोनि मंगेश भोंगाडे, पोउपनि रविंद्र वाघ, पोउपनि भारत थिटे, पोहवा अजय बगडे, पोअं सतिश झिलपे, पोअं श्रीकांत वाढई, पोअं रेखलाल पटले व पोअं वैभव गोहणे यांनी मोलाची भूमिका बजावली.

👉 भिसी पोलिसांच्या वेगवान कारवाईमुळे विजेच्या अॅल्युमिनियम तार चोरी प्रकरणातील गुन्हेगार जेरबंद झाले आहेत.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment