राजुरा ३० ऑगस्ट :-
राजुरा-गडचांदूर-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रं.३५३-ब वरील कापनगाव जवळ ग्रिल कंपनी द्वारे महामार्गाचे काम सुरू आहे.कामाच्या ठिकाणी योग्य दिशादर्शक व बैरिकेट न लावल्याने व कंपनीच्या गलथान कारभारामुळे प्रवासी अॅटो व कंपनीच्या हायवा ट्रक मध्ये झालेल्या भिषण अपघातात अॅटो चालकासह सहा व्यक्तींना जिव गमवावा लागला.
मृतांमध्ये पाचगाव येथील चार तर लगतच्या कोची येथील एक व खामोना येथील एक अशा सहा जणांचा समावेश होता.अपघातात गंभीर जखमींमध्ये पाचगाव एक महिला तर भुरकुंडा येथील एका पुरूषाचा समावेश आहे.
एकाच वेळी सहा व्यक्ती मृत पावले व पाचगाव येथील चार व्यक्तीचा समावेश असणे ही या परिसरातील पहिलीच घटना असल्याने पाचगाव वासियांवर शोककळा पसरली. पाचगाव येथे दि. २९ ला सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
ग्राम पंचायत पाचगाव व ग्रामस्थां कडून दि.३० आॅगस्ट ला छत्रपती शिवाजी महाराज चौकात सामुहिक भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.या वेळी ग्राम पंचायत पदाधिकारी, कर्मचारी,प्रतिष्ठित नागरिक,शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी,जि.प.शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद, विद्यार्थी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. संपूर्ण गाव दुःखात असल्याने पाचगाव येथील सार्वजनिक गणेश मंडळाने या वर्षी गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला.
0 comments:
Post a Comment