Ads

लाडक्या बहिणीच्या खात्यावरील पैसे लंपास – कोलाम भगिनींचा टाहो

कोरपना (प्रा. प्रतिनिधी) – रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला राज्य शासनाच्या ‘लाडक्या बहिणी’ योजनेतून कोलाम समाजातील आदिवासी भगिनींच्या खात्यावर जमा झालेले प्रत्येकी ₹१५०० रुपये फसवणूक करणाऱ्या एका तरुणाने लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पीडित महिलांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
Money stolen from beloved sister's account - Kolam sisters' story
ही घटना ७ ते ८ ऑगस्टदरम्यान टांगारा, खडकी, चनई आणि खैरगाव या भागात घडली. धानोली गावचा अक्षय राठोड नावाचा तरुण, ज्याचे वडील आश्रम शाळेतून निवृत्त कर्मचारी आहेत, थंब मशीन आणि लॅपटॉप घेऊन गावागावात गेला. स्वतःला शासनाने आधार कार्डचे अपडेट काम दिले असल्याचे सांगत त्याने महिलांना त्यांच्या आधार कार्ड, बँक किंवा पोस्ट पासबुक आणण्यास सांगितले.

पैसे जमा झाले असून ते तत्काळ मिळवून देतो, पण तुमचे आधार कार्ड अपडेट नसल्याने अडचण येत आहे, असे सांगत त्याने महिलांचे अंगठ्यांचे ठसे घेतले. काहींचे ठसे लगेच न आल्याने ‘डबल ठसे घेणे आवश्यक आहे’ असे कारण देऊन सर्व ठसे नोंदवले. मात्र, या प्रक्रियेद्वारे त्याने महिलांच्या खात्यात जमा झालेले ₹१५०० प्रत्येकी आपल्या खात्यावर वर्ग करून घेतले.

सायंकाळी महिलांना मोबाईलवर पैसे वळते झाल्याचा मेसेज आल्यानंतर फसवणुकीचा पर्दाफाश झाला. महिलांनी आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण तो गाव सोडून पसार झाला होता. नंतर चौकशीत तो धानोलीचा रहिवासी आणि अक्षय राठोड असल्याचे समजले.

या प्रकरणी पीडित महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सहसचिव आबिद अली यांची भेट घेऊन संपूर्ण हकीकत सांगितली. आबिद अली यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करून दिली. त्यांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करताना म्हटले की, “कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आधार कार्ड, बँकेचे पासबुक किंवा वैयक्तिक कागदपत्रे देऊ नयेत. शंका असल्यास थेट बँक, पोस्ट ऑफिस किंवा तहसील कार्यालयात चौकशी करावी.”

या घटनेमुळे परिसरातील आदिवासी समाजात भीतीचे व असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment