Ads

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, चंद्रपूरतर्फे विशेष दर्शन बस सेवा सुरू

चंद्रपूर : भाविकांसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, चंद्रपूर विभागामार्फत खास प्रवाशांच्या सेवेसाठी पुन्हा एकदा विविध धार्मिक स्थळांच्या दर्शनासाठी विशेष बस सेवा सुरू करण्यात आली आहे.
Maharashtra State Road Transport Corporation, Chandrapur starts special darshan bus service
मार्ग क्र. 1 – सोमनाथ, माकडा देव, चपळाळ दर्शन
चंद्रपूर – अंजयपूर – झोपला मारोती – मूल – सोमनाथ –मार्कंडा- चामोर्शी – आष्टी – चपराळा – बल्लारपूर (कास्ट भांडार) – चंद्रपूर परत.
बस प्रकार – साधी बस.
जाण्याची तारीख –  ऑगस्ट – 15, 18, 19, 25, 29.
निघण्याची वेळ – सकाळी 9.30 वा. व त्याच दिवशी संध्याकाळी परत.
तिकीट दर – प्रौढ ₹145/- व लहान मुलांसाठी ₹121/- (12 वर्षांखालील).

मार्ग क्र. 2 – शंकर देव, सिरपूर, भटाळा दर्शन
चंद्रपूर – धानोरा – गडचांदूर -अंमलनाला – शंकर देव – कोरपना – सिरपूर – वणी – भटाळी-- वरोरा – टेंभुर्डा  –आनंदवन – भद्रावती (विज्ञान मंदिर, नागमंदिर व गणेश मंदिर) – चंद्रपूर परत.
बस प्रकार – साधी बस.
जाण्याची तारीख – ऑगस्ट – 15, 23, 24, 25, 30.
निघण्याची वेळ – सकाळी 7.00 वा. व त्याच दिवशी परत सायं. 5.10 वा.
तिकीट दर – प्रौढ ₹245/- व लहान मुलांसाठी ₹219/- (12 वर्षांखालील).

आरक्षण व विशेष सूचना
प्रवाशांनी आगाऊ आरक्षण करूनच प्रवास करावा.
आरक्षणासाठी एमएसआरटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.msrtc.gov.in) किंवा 'MSRTC Bus Reservation' मोबाईल अ‍ॅपवर सुविधा उपलब्ध.
वयोवृद्ध, महिला, अपंग व विद्यार्थ्यांना शासनमान्य सवलत उपलब्ध.
अधिक माहितीसाठी ई-मेल: dotochn34@gmail.com
भाविकांनी या विशेष दर्शन बस सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन चंद्रपूर आगार व विभागाने केले आहे.
मार्कंडा

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment