चंद्रपूर:-कोरपना तालुक्यातील तुकडोजी नगर येथे मंगळवारी सकाळी एका तरुणाचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली. तपासादरम्यान ही घटना जुन्या वादातून झाल्याचे स्पष्ट झाले असून, पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपीला ताब्यात घेतले आहे.
Youth murdered over old dispute;
मृत तरुणाची ओळख विश्वास नरेंद्र मालेकर (वय २४, रा. तुळशी) अशी पटली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, जुन्या वादातून झालेल्या वादावादीत आरोपीने विश्वास मालेकर यांना मारहाण करत जोरदार धक्का दिला. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच कोरपना पोलिसांनी जलद कारवाई करत सुनील पवार (वय २३, रा. पारधीगुडा) याला अटक केली. त्याच्याविरुद्ध कलम १०३ बीएनएस अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांच्या नेतृत्वात, पोलीस उपनिरीक्षक देवानंद केकन, साईनाथ जायभाये, प्रभाकर जाधव व कोरपना पोलिस पथक करीत आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन कोरपना ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले.
0 comments:
Post a Comment